व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विभागाच्या प्रसिध्दी प्रमुख पदी अरुण हांडे यांची निवड
.....................................
![]() |
अरुण हांडे -प्रसिध्दि प्रमुख |
लातूर / प्रतिनिधी
व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या साप्ताहिक विभागाची जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष विष्णू अष्टेकर यांनी नुकतेच जाहीर केली आहे त्यामध्ये
साप्ताहिक विभागाच्या कार्यकारणीत प्रसिध्दी प्रमुख पदी अरुण हांडे यांची निवड करण्यात आली आहे.
व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष राजा माने व साप्ताहिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे यांच्या आदेशावरून व जिल्हाध्यक्ष बालाजी फड व साप्ताहिक विभागाचे प्रदेश सरचिटणीस वामन पाठक यांच्या सूचनेवरून साप्ताहिक विभागाचे जिल्हाध्यक्ष विष्णू अष्टेकर यांनी ही निवड केली आहे.
या निवडीचे स्वागत संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी फड, सरचिटणीस संगम कोटलवार, कार्याध्यक्ष शहाजी पवार व सुशांत सांगवे, टेलिव्हिजन विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष निशांत भद्रेश्वर प्रदेश संघटक दीपरत्न निलंगेकर, डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सितम सोनवणे , साप्ताहिक विभागाचे उपाध्यक्ष भारत जाधव व विठ्ठल तगलपल्लेवार, कार्याध्यक्ष जाकीर अहमद पटेल, सरचिटणीस बाबुराव बारोळे, कार्यवाहक शेख, संघटक दिगंबर तारे व जिल्ह्यातील पत्रकारांनी केले आहे.