प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत लातूरमध्ये भाजपाचा जिल्हा मेळावा
लातूर दि.०९ – भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष मा. आ. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. १० मे २०२३ बुधवार रोजी दुपारी २ वाजता भाजपाचा जिल्हा संघटनात्मक मेळावा लातूर येथील दयानंद सभागृहात आयोजीत करण्यात आला असून या मेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपाचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड आणि लातूर शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे यांनी केले आहे.
भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पक्ष संघटनात्मक आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रशेखरजी बावनकुळे हे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा जिल्हा निहाय दौरा करीत आहेत. त्यानुसार दि.१० मे २०२३ बुधवार रोजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखरजी बावनकुळे हे लातूर जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात दिवसभरात विविध बैठका, युवा वॉरीअर शाखेचे उद्घाटन, सोशल मिडीया पदाधिकारी बैठक, बूथ कमिटीची बैठक, सामाजिक कार्यक्रम, आदींचा समावेश असून लातूर जिल्हा भाजपाचा संघटनात्मक मेळावा दुपारी २ वाजता लातूर येथील दयानंद सभागृहात आयोजीत करण्यात आला आहे. मा. आ. चंद्रशेखरजी बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच लातूरच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांचे जोरदार भव्य दिव्य स्वागत व्हावे यासाठी जय्यत तयारी केली जात असून शहरात जागोजागी स्वागताचे फलक, भाजपाचे झेंडे लावण्यात आले आहेत.
प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्यात आलेल्या जिल्हा भाजपाच्या मेळाव्यास लातूर जिल्हयातील भारतीय जनता पार्टीचे सर्व लोकप्रतिनीधी, पदाधिकारी, विविध आघाडी आणि मोर्चाचे पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख व कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपाचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड आणि लातूर शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे यांनी केले आहे.