कर्नाटक निवडणूक निकालात भाजपा चा दारुन पराभव करत काँग्रेस पक्षाने बाजी मारली
आज कर्नाटक निवडणूक निकालात काँग्रेस पक्षाने बाजी मारली आणि १३६ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि कर्नाटकचे निष्प्रभ मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना त्यांची जागा दाखवून दिली.
भारताच्या संसदीय राजकारणात २०१४ पासून भारतीय जनता पक्षाने मोदी आणि शहा यांच्या नेतृत्वाखाली जो खेळ सुरू केला आहे, तो थांबवता येऊ शकतो, त्याला शह देता येऊ शकतो, असा विश्वास आज कर्नाटकच्या निवडणूक निकालाने या देशातील सर्वसामान्य लोकांच्या मनात निर्माण केला आहे.
आणि हा विश्वास निर्माण करण्याचे मोठे काम राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेमध्ये केले होते. त्याचे एक उत्तम असे फलित या निवडणूक निकालाने देशासमोर आले आहे.
कर्नाटकातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रभावी नेते डी. के. शिवकुमार या दोघांनीही जे सामंजस्य निवडणूक प्रचारात ठेवले, त्यालाही या विजयाचे श्रेय दिले पाहिजे.
आणखी एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे. त्याबाबत काही लोक आक्षेप घेतील, टीका करतीलही. प्रियंका गांधी यांची या प्रचारातील उपस्थिती आणि त्यांचा लोकांशी झालेला संवाद ही देखील गोष्ट खूप महत्त्वाची आहे.
कर्नाटकच्या संसदीय राजकारणात इंदिरा गांधींचे गारुड बरीच वर्षे होते, त्याचाच काहीसा आभास प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीने कर्नाटक निवडणूक निकालात आज दिसला आहे, असे म्हणायला हरकत नाही.
लोकांचे जे महत्त्वाचे मुद्दे होते त्या मुद्द्यांनाही तितकेच ठळकपणे अधोरेखित केले पाहिजे. भाजप प्रणित सरकारने केलेला भ्रष्टाचार, भाजपच्या प्रचार यंत्रणेने अतिशय बेलगामपणे केलेला अल्पसंख्याक समाजाच्या विरोधातील प्रचार, त्यासाठी केरला स्टोरीचा मुद्दाही पंतप्रधानांनी प्रचारात घेतला आणि या सर्वांच्या पलीकडे बजरंग बलीचा अतिशय वरकरणी उच्चार करून,तो मुद्दा मांडून लोकांना भ्रमित करण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न पूर्णपणे फसला आहे.
लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून ज्या अनेक अनिष्ट गोष्टी भारताच्या संसदीय लोकशाहीत शिरल्या आहेत, त्या आम्ही नाकारतो आहोत, असा स्वच्छ संदेश कर्नाटकमधील मतदारांनी दिला आहे. हा संदेश आपण स्वीकारला पाहिजे आणि त्याचा विचार केला पाहिजे. भारतीय जनता पक्षाच्या एकूण धोरणात आणि व्यूहरचनेत फरक करण्याची वेळ आली आहे. हिंदू- मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करून आपल्याला हिंदूंची एकगठ्ठा मते मिळतील, या भ्रमात भाजप राहिला तर, त्यांना यावर्षी होणाऱ्या राजस्थान – २००, मध्यप्रदेश – २३० आणि छत्तीसगड- ९० जागा , या तीनही मोठ्या राज्यात, यापेक्षाही कठोर पराभवास सामोरे जावे लागेल.
पुण्यातील आणि महाराष्ट्रातील एक पत्रकार अभ्यासक म्हणून माझी ही निरीक्षणे मी नोंदवत आहे.
भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी यांनी रक्ताचे पाणी करून विद्वेषाच्या राजकारणाविरुद्ध भूमिका मांडली.
पंतप्रधानांना अडचणीच्या वाटणाऱ्या काही मुद्दे आणि गोष्टींबाबत राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पाच्या उत्तरार्ध सत्रात काही प्रश्न उपस्थित केले, त्यातल्या एकाही प्रश्नाला पंतप्रधान उत्तर देऊ शकले नाहीत.
दरम्यानच्या काळात सुरतमधील एका कनिष्ठ न्यायालयाने कर्नाटकातील काही वर्षापूर्वीच्या भाषणातील राहुल गांधींच्या विधानावर बदनामीच्या खटल्यात त्यांना २ वर्षांची शिक्षा सुनावली. ताबडतोब तत्परतेने लोकसभा सचिवालयाने त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द टाकले आणि ते लोकसभेमध्ये पुन्हा नवीन प्रश्न विचारायला येणार नाहीत, याची काळजी घेतली.
कर्नाटक निवडणूक निकालाने राहुल गांधी हे मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांना किती भारी पडणार आहेत, याचा स्वच्छ निकाल तेथील जनतेने दिला आहे.
भारताच्या संसदीय लोकशाहीत धार्मिक आणि जातीय राजकारणाने निर्माण झालेल्या वातावरणात धर्मनिरपेक्ष आणि सुसंवादी राजकारणाची नवी स्पेस निर्माण करण्याची संधी काँग्रेसला मिळाली आहे.
लोकांचे जे महत्त्वाचे मुद्दे होते, त्या मुद्द्यांनाही तितकेच ठळकपणे अधोरेखित केले पाहिजे.
कर्नाटक भाजपप्रणित सरकारने केलेला भ्रष्टाचार, भाजपच्या प्रचार यंत्रणेने अतिशय बेलगामपणे केलेला अल्पसंख्याक समाजाच्या विरोधातील प्रचार, त्यासाठी केरला स्टोरीचा मुद्दाही पंतप्रधानांनी प्रचारात घेतला आणि या सर्वांच्या पलीकडे बजरंग बलीचा अतिशय वरकरणी उच्चार करून, तो मुद्दा मांडून लोकांना भ्रमित करण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न पूर्णपणे फसला आहे.
लोकसभेच्या २०१४ पासून झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून ज्या अनेक अनिष्ट गोष्टी भारताच्या संसदीय लोकशाहीत शिरल्या आहेत, त्या आम्ही नाकारतो आहोत; असा स्वच्छ संदेश कर्नाटकमधील मतदारांनी दिला आहे. हा संदेश आपण स्वीकारला पाहिजे.
काँग्रेस पक्षाने देखील यापुढील काळात काही ठळक गोष्टी समोर ठेवून काम केले पाहिजे तरच २०२४ मधील १८ व्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला किमान चांगले यश मिळण्याची शक्यता निर्माण होईल.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि तरुण नेते सचिन पायलट यांच्यामधील बेबनाव ताबडतोब थांबण्याची आवश्यकता आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील काँग्रेस पक्षाच्या संघटनांनी अधिक एकसंधपणे कामाला उभे राहिले पाहिजे.
Tags:
ELECTION NEWS