Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळविण्यासाठी राज्य सरकारकडून आता नवी सुविधा योजना सुरू

मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळविण्यासाठी राज्य सरकारकडून आता नवी सुविधा योजना सुरू 

मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळविण्यासाठी राज्य सरकारकडून आता नवी सुविधा योजना सुरू
त्यानुसार संपर्कासाठी ८६५०५६७५६७ हा नवा मोबाइल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर मिस्डकॉल देताच मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज मोबाइलवर उपलब्ध करून दिला जाणार आहे. 
राज्यातील कानाकोपऱ्यांतून या सहायता निधीतून मदतीसाठी इच्छुक असणाऱ्या नागरिकांना या सुविधेमुळे दिलासा मिळणार आहे.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत जाहीर केली जाते. विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली जाते. यासाठीचा अर्ज कुठे मिळतो, तो कसा भरायचा किंवा तो मुख्यमंत्री कार्यालयातूनच घ्यावा का?, अशा विविध शंका सर्वसामान्यांच्या मनात असतात. 
सर्वसामान्य नागरिकांची ही शंका दूर करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाने आता हा नवा उपक्रम जाहीर केला आहे. इच्छुकांनी या क्रमांकावर मिस्डकॉल दिल्यानंतर अर्जाची लिंक एसएमएसद्वारे मोबाइलवर येईल. त्या लिंकवर क्लिक करताच अर्ज डाउनलोड होईल. या अर्जाची प्रिंट काढून तो भरून त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह सर्व पोस्टाद्वारे किंवा स्कॅन करून पीडीएफ स्वरूपा cmrf.maharashtra.gov.in या ईमेल आयडीवर पाठवता येईल, अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली...
Previous Post Next Post