लातूरचा 'सुमित कोकरे'आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेत चमकला
लातूर : सोळा वर्षांखालील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन च्या वतीने छत्रपति संभाजी नगर येथे अंतर जिल्हा स्पर्धेत लातुर येथील 'रोहन क्लबचा''चा सुमित कोकरे याची निवड झाली आहे.विशेष म्हणजे बाभळगाव पोलिस ट्रेनिंग सेंटर येथे सपोनी एस बी कोकरे यांचे ते चिरंजीव आहेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन च्या वतीने १६वर्षांखालील राज्यस्तरीय आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धा सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत लातूर जिल्हा क्रिकेट संघातून खेळताना सुमित कोकरे यानेअष्टपैलू कामगिरी केली. . छत्रपति संभाजी नगर क्रिकेट संघाविरोधात त्याने १२३ धावा केल्या. सिंधुदुर्ग क्रिकेट संघाविरुद्ध ८७ धावा केल्या तर रायगढ़ विरूद्ध ४९ केल्या ,एकूण ३५०रण काढुन अतिशय उत्कृष्ट कामगीरी केली.
त्याला जिल्हा क्रिकेट संघाचे प्रशिक्षक विकास निर्फळ, यांचे मार्गदर्शन लाभले असुन या नेत्रदिपक कामगीरीमुळे संपुर्ण लातुर जिल्ह्यामध्ये त्याचे मित्र व नातेवाईकांकडुन कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे