Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

महाराष्ट्र टेस्ट ट्यूब बेबी असोसिएशनवर सलग तिसऱ्यांदा डॉ. कल्याण बरमदे यांची निवड

महाराष्ट्र टेस्ट ट्यूब बेबी असोसिएशनवर सलग
तिसऱ्यांदा डॉ. कल्याण बरमदे यांची निवड


लातूर : लातूर येथील ख्यातनाम स्त्री रोग , वंध्यत्व निवारण तज्ञ तथा टेस्ट ट्यूब बेबी तज्ञ डॉ. कल्याण बरमदे यांची महाराष्ट्र टेस्ट ट्यूब बेबी असोसिएशनवर सलग तिसऱ्यांदा निवड झाली आहे. या कार्यकारीणीवर निवडले गेलेले डॉ. कल्याण बरमदे हे लातूरसारख्या ग्रामीण भागात टेस्ट ट्यूब बेबीमध्ये उत्कृष्ट कार्य करणारे मुंबई बाहेरचे एकमेव सदस्य आहेत, हे विशेष.
एमएसआर आयएसएआर अर्थात महाराष्ट्र टेस्ट ट्यूब बेबी असोसिएशनची वर्ष २०२३ ते २०२५ ची कार्यकारीणी निवडण्यासाठी डॉ. प्रकाश त्रिवेदी यांच्या अध्यक्षतेखाली दि. १५ ते ३० एप्रिल दरम्यान ऑनलाईन पध्दतीने निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये राज्यभरातील १६२ टेस्ट ट्यूब बेबी तज्ञ डॉक्टर्सनी मतदान केले. या कार्यकारी समितीवर निवडल्या गेलेल्या एकूण सदस्यांपैकी केवळ डॉ. कल्याण बलभीमराव बरमदे हे मुंबईबाहेरचे एकमेव तज्ञ आहेत. उर्वरीत आठ सदस्य मुंबईचे तर एक सदस्य पुणे येथील आहेत.
लातूरसारख्या ग्रामीण भागात आरोग्य क्षेत्रात विशेषतः वंध्यत्व निवारण - टेस्ट ट्यूब बेबी मध्ये डॉ. कल्याण बरमदे यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. आपल्या बरमदे हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत हजारो अपत्यहिन दांपत्याच्या जीवनात अपत्यप्राप्तीचा आनंद निर्माण करण्याचे काम केले आहे. विशेष म्हणजे हे कार्य त्यांनी मुंबई - पुण्याच्या तुलनेत अत्यंत नाममात्र शुल्कात केले आहे व अजूनही सातत्याने करत आहेत. या कार्यकारिणीवर डॉ. कल्याण बरमदे यांच्यासह डॉ. अश्विनी काळे, डॉ. रोहण पळशेटकर, डॉ. निलम भिसे, डॉ. सुदेश कामत, डॉ. रितू हिंदूजा, डॉ. प्रतिक तांबे, डॉ. शितल सावनकर यांचीही निवड झाली आहे. डॉ पद्मारेखा जिरगे ह्या असोसिएशनच्या नूतन अध्यक्ष होणार आहेत . तर सचिव म्हणून डॉ केदार गाणला आणि लायब्रेरियन म्हणून डॉ कुंदन इंगळे यांची निवड झाली आहे. 
Previous Post Next Post