Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

व्हॉईस ऑफ मीडियाचे गुरुवारी जिल्हाभरात धरणे आंदोलन

व्हॉईस ऑफ मीडियाचे गुरुवारी जिल्हाभरात धरणे आंदोलन


लातूर, प्रतिनिधी

 पत्रकार आणि वृत्तपत्रा संदर्भातील विविध मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडियाने गुरुवारी (दि.११) राज्यव्यापी धरणे आंदोलन पुकारले असून त्याअंतर्गत लातूर जिल्ह्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तहसिल कार्यालयासमोर सकाळी ११ ते १ यावेळ्त हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन व्हॉईस ऑफ मीडियाच्या लातूर जिल्हा शाखेने केले आहे.

  पत्रकार सर्वांचे प्रश्न मांडत व ते मार्गी लावण्यसाठी महत्वाची भूमिका बजावत असले तरी त्यांच्या प्रश्नाकडे सरकार पुरेसे लक्ष देत नाही. या प्रश्नांप्रति सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व ते मार्गी लावण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडियाने हे आंदोलन उभारले आहे. पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा. पत्रकारितेत ५ वर्ष पुर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी. वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागू असलेला जीएसटी रद्द करावा. पत्रकारांच्या घरांसाठी म्हणून विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा. कोरोनात जीव गमावलेल्या पत्रकारांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे. शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात. या मागण्यांसाठी हे आंदोलन होणार आहे. या मागण्या मार्गी लावण्यासाठी जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या पत्रकारांनी मोठ्या संख्येत आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष बालाजी फड, सरचिटणीस संगम कोटलवार, कार्याध्यक्ष शहाजी पवार, सुशांत सांगवे, संघटक सचिन चांडक, उपाध्यक्ष अजयकुमार बोराडे पाटील, टेलिव्हीजन विभागाचे प्रदेशउपाध्यक्ष निशांत भद्रेश्वर, प्रदेश संघटक दीपरत्न निलंगेकर, डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष डॉ. सितम सोनवणे. साप्ताहिक विभाग जिल्हाध्यक्ष विष्णू अष्टेकर, प्रभाकर शिरुरे, वामन पाठक, बालासाहेब जाधव, विनोद चव्हाण, विजय कवाळे, योगिराज पिसाळ, योगेश शर्मा आदींसह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
Previous Post Next Post