मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लातूर जिल्हा दौरा
लातूर, दि. ०९ (जिमाका) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवार, १० मे २०२३ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. औसा येथे होणाऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्यास ते उपस्थित राहतील.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे १० मे रोजी सांयकाळी पाच वाजता लातूर विमानतळ येथे आगमन होईल व औसाकडे प्रयाण करतील. सायंकाळी सव्वापाच वाजता औसा येथील उटगे मैदानावर आयोजित आमदार अभिमन्यू पवार यांच्या मुलाचा शुभविवाह व सामुदायिक विवाह सोहळ्यास ते उपस्थित राहतील. सायंकाळी सहा वाजता औसा येथून बिदरकडे प्रयाण करतील.