गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
अतिक्रमित जागेवर अवैधरित्या चालू असलेले खाटिकखाणे बंद करावी..अन्यथा आम्ही रास्तारोको आंदोलन करू
उदगीर-
हाळी व हंडरगुळी ता. उदगीर येथे नांदेड बिदर राज्यमार्गालगत व.जि.प. शाळेपुढे सा.बां. जागेवर अतिक्रमण करून अवैधरित्या विनापरवाना खाटिक खाणे आणि ( मुस्लीम खानावळी खुलेआमपणे चालत आहेत. या खाटीक खाण्यामुळे जि.प.शाळेतील मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच यांच्या अतिक्रमणामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच या खाटकांकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचा कसलाही परवाना नाही. तसेच कोंबडे बकरे & बैल यांची कत्तल करण्यापूर्वी पशुवैद्यकीय डॉक्टर कडून पशु पक्षांची तपासणी करत नाहित व रोग असलेले मांस - मटन विकतात. हंडरगुळी येथील विविध मंदिराकडे जाणाऱ्या रोडवरच हे खाटिक घाणपाणी, हाड, मांस टाकतात. तरी मा. साहेबांनी अतिक्रमण केलेले व कसलाच परवाना नसलेले खाटिकखाने आणि मुस्लीम खानावळी त्वरित बंद करून त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी अन्यथा आम्ही रास्तारोको आंदोलन करू याचीअसा इशारा तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात दिला आहे