गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लैंगिक गैरवर्तनासाठी दोषी
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिवाणी न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. एका मासिकाची लेखिका ई. जीन कॅरोल यांनी डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी १९९० मध्ये त्यांच्यासोबत लैंगिक गैरवर्तन आणि त्यांना खोटारडी म्हणून बदनाम करण्याचा आरोप केला होता. न्यायालयाने या प्रकरणात निर्णय दिला असून कॅरोलला ५ मिलियन डॉलर नुकसान भरपाई म्हणून देण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना निर्देश दिले आहेत.
Tags:
Crime News