गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गदारोळ; पत्रकारांचेही ओढले पाय
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात यापूर्वी गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात काही हुल्लडबाज तरुणांनी मोठा गोंधळ घालण्यास सुरुवात केली. नाशिकमधील नवनिर्माण सेवाभावी संस्थेच्या वतीने रुग्णवाहिकेसाठी निधी जमवण्यासाठी गौतमी पाटीलच्या लावणीचा हा कार्यक्रम त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी माध्यम प्रतिनिधींसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी काही हुल्लडबाज तरुणांनी उपस्थित पत्रकारांचे पाय ओढण्यास सुरुवात केली. त्यामुळे दोन्ही पत्रकारांना व्यासपीठावरून पाय धरून खाली ओढण्यात आल्याने त्यांना दुखापत झाली. तसेच काही तरुणांनी या दोघांना मारहाणदेखील केली. यामध्ये कॅम-याचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या प्रकारानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ही गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला.