Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

अनैतिक संबंध बघीतले म्हणुन चिद्रेवाडी येथील गणेशचा खून

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
अनैतिक संबंध बघीतले म्हणुन चिद्रेवाडी येथील गणेशचा खून 
आरोपीच्या गळ्यातील "माळ"च बनली आरोपींचा "काळ"
खुनी व्यक्ती घटनास्थळी मजेत फिरत होता.अन् i.p.s.निकेतन बी. कदम यांच्या तल्लख बुध्दीत अडकत होता.






लातूर/ हंडरगुळी~येथून जवळच असलेल्या मौजे,चिद्रेवाडी ता.चाकुर येथे दि.१५ ते १६ मे च्या दरम्यान झालेल्या खुनाचा शोध ips अहमदपुर- चाकुर विभागाचे "सिंघम" पोलीस अधिक्षक निकेतन बी.कदम यांचे मार्गदर्शात वाढवणा पोलीसांनी अत्यंत गुनी असलेल्या मयत गणेशचे मारेकरी,खुनी व्यक्तींना ४८ तासात जेरबंद केले असुन मयताची आई श्रीमती.शिवगंगाबाई गंगाधर उस्तुर्गे वय.६० धंदा.घरकाम रा.चिद्रेवाडी ता.चाकुर यांच्या लेखी जबाबावरुन पोलीसांनीतपास करुन व अत्यंत हुशारीने आरोपींना ४८ तासांमध्ये पकडल्याने i.p.s. "सिंघम" पैलीस अधिक्षक निकेतन बी.कदम सर व पोउपनी.गायकवाड एम.के.यांचे व इतर सहयोगी पोलीसांचे जनतेतून अभिनंदन व कौतूक केले जात आहे. याची पोलीसांकडून कळालेली थोडक्यात माहिती अशी की,मयत गणेशचा चिद्रेवाडी येथे त्याच्याच शेत शिवारात दि.१५ मे रोजी ज्वारीची राखण करण्यासाठी म्हणुन घरातील बाज घेऊन झोपण्यास गेला होता.तो दुसर्र्या दिवशी स.९ वा.पर्यंत घरात आला नाही.तसेच त्याचा फोन सुध्दा लागत नाही.म्हणुन मयताच्या आईने शोध घेत विचारपुस केली.तरी सुध्दा गणेशचा पत्ता लागला नाही.म्हणुन मग आई घरी विचारात पडली असता मयताची वहीनी शौचास म्हणुन घरा जवळच्याच शेताकडे गेली असता त्याच शेतातील धु-याच्या कडेला दीर गणेशचा देह नग्नावस्थेत पडल्याचे पाहुन एक ओरडा केला.व हा आरडा ओरडा ऐकूण महादेव मंदीरा जवळ बसलेले कांही व्यक्ती घटनास्थळी धावुन गेले.व पाहिले असता गणेशचा देह नग्नावस्थेत पडलेला व त्याच्या गुप्तांगावर व गळ्यावर व्रण दिसुन आले.म्हणुन याची माहिती त्वरीत वाढवणा पोलीस व पोलीस अधिक्षक चाकुर,अहमदपुरचे निकेतन बी.कदम हे सहका-यासह घटनास्थळी दाखल झाले.व मयताची व परिसराची पाहणी केली. व उपस्थितांशी मयत गणेश बद्दल व खुन का?झाला.याची चौकशी केली असता कांहीच " क्लू " मिळत नव्हता.तसेच प्रत्येकजण म्रत गणेशचा स्वभाव खुप चांगला होता.व मयत हा कोणत्याच कुटाण्यात जात नसत.अशीच माहिती गावात मिळत होती.यामुळे हा खुन का व कोणी केला?हा प्रश्न पोलीसांना पडलेला होता.तसेच एक युवक मयता सोबत राञी उशीरा पर्यंत होता.व तोच खुन झाल्यानंतर ips कदम सर व इतर पोलीसांना कांहीबाई माहिती सांगत होता.पण या प्रकरणाचा "मास्टर माईंड" असलेलाच युवक घटनास्थळी पोलीसांसह जनतेशी कुजबुज करत होता.म्हणुन त्याच्यावर कुणाचाच संशय आला नाही.पण म्हणतात ना की गुन्हेगार किती चलाख व हुशार असलातरी तो कांहीतरी चुक करतोच किंवा घटनास्थळी एखादी वस्तू विसरतोच.अगदी अशा प्रकारे घटना- स्थळी पडलेली रुद्राक्षाची माळ बनली खुनी इसमाची कर्दनकाळ. असे म्हणने चूक ठरु नये.कारण ज्या रुबाबात घटनास्थळी व पोलीसांसंगे प्रदीप करडखेले रा.खरबवाडीकर हा वावरत होता.त्याचे तसे वावरणे आन् ती माळ तोच खुनी असल्याचा पक्का संशय पोलीसांना आला.आणी मग त्यास विचारणा करताच तो पोपटा सारखा मिटूमिठू सगळी हकीकत सांगू लागला.व जनतेतून समजले- ली थोडक्यात घटना कशी की, यातील आरोपी नामे प्रदीप करडखेले रा.खरबवाडी.ता. अहमदपुर वय.२८ याचे व प्रियंका नामे स्ञी सोबत गत एक वर्षापासुन अनैतिक संबंध असुन आरोपी हे दोघेही बाहेरगावचे आहेत. यापैकी आरोपी प्रदीपचे आजोळ व महिला आरोपी प्रियंकाच्या मावशीचे चिद्रेवाडी हे गाव आहे.आणी मावशी चे आॅपरेशन झाल्याने तिला मदत व्हावी.म्हणुन प्रियंका ही चिद्रेवाडीत अंदाजे महिनाभरापासुन राहत होती. व ती आल्याचे समजताच तिचा प्रेमी असलेला प्रदीप हा ही मामाकडे मनुन आला.असता दोन्ही आरोपी नेहमीचे सारखे एकांतात भेटून स्वर्ग सुखाचा आनंद घेऊ लागल्याची कुणकुण ही मयत गणेशला लागली.आणी घटने अगोदर राञी उशीरा अनेकदा महिला आरोपी प्रियंका ही अनेकदा टमरेल घेऊन मावशीच्या घरुन बाहेर ये—जा करु लागली.व याचा माग घ्यायचाच असे म्हणत मयत गणेशने आरोपींच्या हालचालीवर लक्ष ठेवले.व आरोपी हे प्रणयक्रिडेत विवस्ञावस्थेत असताना चा व्हिडीओ बनवु लागला.व ही बाब आरोपी प्रियकर प्रदीपच्या लक्षात येताच मयत गणेश व नातेवाईक असलेला आरोपी प्रदीप या दोघांत झटापट झाली.यात प्रदीपने गणेशचे गुप्तांग दाबुन त्यावर जबर वार केला. आणी यातच गणेश मरण पावला.तरी पण नंतर आरोपीने गणेशचा गळा आवळला.व तो ठार झाल्याची खाञी होताच मयताची विल्हेवाट लावण्या करीता मयताच्या अंगातील कपडे काढून प्रेत आरोपींनी अन्य ठिकाणी नांगरलेल्या वावरातुन ओढत नेले. परंतू कोणीतरी बघेल या भीतीपोटी प्रेत धु-यालगतच्या विहीरीजवळ टाकले.आरोपी प्रदीप शंकरकरडखेले व आरोपी प्रियंका अंतेश्वर हिंगमीरे ही प्रेमीयुगल जोडी घटनास्थळावरुन निघुन गेले.आणि पोलीसांनी सदरील गुन्ह्याचा मोठ्या शिताफीने तपास करुन अवघ्या ४८ घंट्यात आरोपींना अटक केली आहे.या बाबत आमचे प्रतिनिधी विठ्ठल पाटील यांनी वाडीत जाऊन माहीती घेतले असता.कांहींनी नाव उघड होऊ देऊ नका.या अटीवर सांगीतले की,यात मयताचे वय व अंगकाटी पाहता मयत हा या दोन्ही आरोपींशी चांगली झूंज देऊ शकला असता.पण या दोघांसंगे इतर कांही व्यक्ती मारेकरी असू शकतात.अशी कुजबूज दबक्या आवाजात वाडीकर जनतेत आहे.यात घटनास्थळी प्रदीप या आरोपीच्या गळ्यातील पडलेली ती " माळ " च बनली आरोपींची "काळ" असे म्हणने चुक ठरु नये. एकंदरीत गुनी असलेल्या मयत गणेश वरच नको ते विघ्नं आणलेले खुनी तत्काळ पकडण्यात i.p.s. "सिंघम" पोलीस अधिक्षक निकेतन बी.कदम, पोउपनी.गायकवाड एम.के.तसेच हाके व रायभोळे,गणेश केंद्रे आदींना यश आले असुन,आरोपींनी तसेच मयताच्या आईने दिलेल्या जबाबाची खातरजमा करुन तपासाची आगामी दिशा ठरवण्याचे काम पोलीस करत असल्याची माहिती सुञांनी दिली....
Previous Post Next Post