Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना बीड, अहमदनगर मधून पकडले. घरफोडीचे 07 गुन्हे उघड.

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना बीड, अहमदनगर मधून पकडले. घरफोडीचे 07 गुन्हे उघड.
 सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम सह 4 लाख 8 हजार रुपयाच्या मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.*


                  याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणारे चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता आदेशित व निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे,उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर श्री. भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखे चे पोलीस निरीक्षक श्री.गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हेचे विविध पथके तयार करून जिल्ह्यात घडलेल्या घरफोड्या संदर्भाने तपास करण्यात येत होता. 
            लातूर जिल्ह्यातील तसेच लातूर जिल्हालगत असलेल्या इतर जिल्ह्यातील गुन्हेगारांची माहिती काढण्यात येत होती. गुन्हेगारांची माहिती मिळवण्याकरिता बातमीदार नेमण्यात आले होते. त्यांच्या मार्फतीने मिळालेल्या माहितीचे तसेच तांत्रिक माहितीचे बारकाईने विश्लेषण करण्याचे काम सुरू होते.
           
                 दरम्यान गोपनीय बातमी दाराकडून मिळालेल्या विश्वासनीय व खात्रीलायक माहिती मिळाली की लातूर शहरामध्ये विविध पोलीस ठाण्याचे हद्दीत घरपोडीचे गुन्हे करणारे संशयित आरोपी हे बीड, व अहमदनगर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने दिनांक 02/11/2022 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बीड, अहमदनगर जिल्ह्यात रवाना करण्यात आले. सदर पथके तेथे पोहोचून गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीची खातरजमा करून दिनांक 03/06/2023 रोजी लातूर जिल्ह्यातील घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी नामे


1) अमोल धर्मा इगवे, 28 वर्ष, राहणार उमापूर तालुका गेवराई जिल्हा बीड.

2) गणेश मिलिंद सूर्यवंशी, वय 23 वर्ष, राहणार घूमेगाव , तालुका गेवराई जिल्हा बीड.

3) विकास सुनील घोडके, वय 27 वर्ष, राहणार मेनरोड, शेवगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर.

         असे क्रमांक 1 ते 3 आरोपींना ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या अजून एक साथीदार आरोपीसह लातूर शहरातील विविध ठिकाणी घरफोडीचे गुन्हे करून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याचे कबूल केले तसेच लातूर शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या अभिलेखाची पडताळणी केली असता नमूद आरोपी त्यांनी संगणमत करून लातूर शहरातील पोलीस ठाणे शिवाजीनगरच्या हद्दीत 3 घरफोडीचे गुन्हे व पोलीस ठाणे एमआयडीसीच्या हद्दीत 4 घरफोडीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून नमूद घरफोडीच्या गुन्ह्यात चोरलेल्या सोन्या-चांदीच्या दागिने व रोख रक्कम असा एकूण 04 लाख 8 हजार रुपयेचा मुद्देमाल नमूद आरोपींताकडून जप्त करण्यात आला आहे.
            फरार आरोपीचा शोध स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घेत असून पुढील तपास शिवाजीनगर व एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करीत आहेत.
              
              सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा लातूर येथील सपोनी वेंकटेश आलेवार, पोलीस अंमलदार खुर्रम काझी, यशपाल कांबळे, राजेश कंचे, संतोष देवडे, मोहन सुरवसे, रवी गोंदकर, मनोज खोसे, राहुल कांबळे, नकुल पाटील यांनी बजावली आहे.
Previous Post Next Post