शेतकरीविरोधी कायदे पुस्तिकेचे
18 जूनला लातूर येथे प्रकाशन
लातूर-
शेतकरी पारतंत्र्य दिनाच्या निमित्ताने शेतकरी संघटनेद्वारा लातूर येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात अमर हबीब लिखित 'शेतकरीविरोधी कायदे' या मराठी पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन होणार आहे.
पत्रकार भवन येथे दुपारी १ वाजता होणाऱ्या या मेळाव्याला शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे, 19 मार्च पासून जिल्ह्यात परिक्रमा केलेले अनंत देशपांडे, किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब, डॉ राजीव बसरगेकर, अमृत महाजन हे मार्गदर्शन करणार आहेत.
शेतकरीविरोधी सीलिंग, आवश्यक वस्तू, अधिग्रहण व परिशिष्ट ९ च्या संबंधी सर्व शंका कुशंकांचे या पुस्तिकेत निरसन केले आहे. सीलिंग उठले तर पुन्हा जमीनदारी येईल का? भांडवलदार येतील का? स्वामिनाथन आयोगाची ती शिफारस शेतकऱयांच्या हिताची आहे का? शेतकरी आत्महत्याना कोण जबाबदार आहे? अशा 37 प्रश्नांची उत्तरे या पुस्तिकेत वाचता येतील.
अमर हबीब यांनी ही पुस्तिका लिहिली आहे. ते सुरुवाती पासून शेतकारी आंदोलनात सक्रिय राहिले आहेत. त्यांना पत्रकारितेचा दीर्घ अनुभव आहे. त्यांच्या लेखणीतून साकार झालेल्या या पुस्तिकेने शेतकरी प्रश्नाच्या गाभ्याला हात घातला आहे.
या पुस्तिकेचे हिंदी व इंग्रजीत भाषांतर झाले आहे.