गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लातूरमधील जिल्हा बँकेच्या ATM विभागात करोडोचा घोटाळा
लातूर :लातूर जिल्ह्यातील शेतकर्यांचा कना असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध सात शाखांमधील 'एटीएम' व्यवहारात एक कोटी चार लाख एकोणपन्नास हजार सहाशे रूपयांचा आर्थिक घोटाळा झाला असल्याची धक्कादायक माहिती उघडकिस आली असल्याने संपुर्ण लातुर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बँकेच्या उपसव्यवस्थापकाच्या फिर्यादीवरून अज्ञाताच्या विरोधात दि.२४/६/२०२३रोजी ४२०,४७७,४६८,४७१,३४, माहिती तंत्रज्ञान कायदा ६५,६६ब नुसार शिवाजी नगर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.बॅंकेचे सभासद असलेल्या ग्रामीण भागातील शेतकर्यांना पैसे काढण्यासाठी सोय व्हावी या उद्देशाने जिल्हा बँकेने एखाद्या राष्ट्रीयीकृत बँकेप्रमाणे 'एटीएम' सुविधा चालू केली. पण जानेवारी २०२२ ते जून २०२३ दरम्यान लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अहमदपूर, चाकूर, एमआयडीसी दत्तनगर, उदगीर आदीसह सात शाखेतील एटीएम मशीनशी छेडछाड करून या मशीन विविध बँकेचे एटीएम कार्डचा वापर करून एक कोटी चार लाख एकोणपन्नास हजार सहाशे रुपयांची फसवणूक केली असून फसवणूक झाल्याचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. सुमारे अठरा महिन्याच्या कालावधीत हि फसवणूक झाली आहे. अशी फसवणूक कोणी केली. यात ईतर जबाबदार अधिकारी-कर्मचारी सहभागी आहेत का? एवढ्या प्रदिर्घ काळात एवढा मोठा घोटाळा बँकेस लक्षात कसा आला नाही असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या घोटाळा प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल आहे.पुढील तपास शिवाजी नगर पोलिस स्टेशन चे पोलिस निरिक्षक श्री मिरकले करित आहेत