गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
पत्रकार प्रा. रणजीत इंगळेच्या मारेकर्याला तात्काल अटक करा
व्हाईस ऑफ मिडीया (सा.विं.)चे निवासी उपजिल्हाधिकार्यांना निवेदन
अकोला : दै. वृत्तरत्न सम्राटचे जिल्हा प्रतिनिधी प्रा. रणजित देवराव इंगळे याच्या मारेकर्यांना तात्काळ अटक करा या बाबतचे निवेदन व्हाईस ऑफ मिडीय साप्ताहिक विंगचे अकोला जिल्हा कार्यकारिणीतर्पेâ निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले.
राज्याचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पालकत्व असलेल्या जिल्ह्यात शनिवार दि. १७ जून २०२३ रोजी रात्री मृतक प्रा. इंगळे हे दोन्ही पायांनी दिव्यांग असून अशा प्रकारे पत्रकाराची हत्या होणे हे अत्यंत क्लेशदायक आहे. महाराष्ट्रातील फुले, शाहू आंबेडकरी विचाराच्या राज्याला हे लाजीरवाणे आहे.
जुने शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत गंगानगर परिसरात राहणारे प्रा. रणजीत देवराव इंगळे रात्री ११.३० वा. च्या दरम्यान त्यांचे जूने बसस्थानक अकोला येथील सेतू केंद्र बंद करून घराकडे जात असतांना अज्ञात व्यक्तीने मागून येवून पत्रकार प्रा. रणजीत इंगळे यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून ठार मारण्यात आले. पत्रकाराच्या हत्येने वाशिम बायपास परिसरात मोठी दहशत निर्माण झाली. प्रा.रणजीत इंगळे यांच्या मागे पत्नी,दोन मुले व विधवा आई आहे.
मागच्या आठवड्यात नांदेड येथे अक्षय भालेराव या बौद्ध युवकाची ‘भीमजयंती’ का साजरी केली म्हणून खुलेआम हत्या होते. तसेच अकोल्यातील पत्रकाराची कन्या मुंबईला उच्च शिक्षण घेत असतांना तिच्यावर देखिल बलात्कार करून तिची अमाणूसपणे हत्या करण्यात आली़ शासनाच्या नाकर्तेपणाच्या धोरणामुळे तिला तिचा जीव गमवावा लागला आहे, तिच्या कुटूंबाला शासनाने ५० लाखाची आर्थिक मदत करावी.
पत्रकार प्रा. इंगळे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करून आरोपीला त्वरित अटक करावी तसेच पत्रकार प्रा. रणजीत इंगळे यांचे पश्चात त्यांचे कुटूंबावर मोठा आघात झाल्याने त्या कुटूंबाला पन्नास लाखाची तातडीने मदत करावी अशी जिल्हाभरातील पत्रकारांतर्पेâ तसेच व्हाईस ऑफ मिडीया अकोला जिल्हा साप्ताहिक विंगतर्पेâ महाराष्ट्र शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर व्हाईस ऑफ मिडीया सा.विं.चे जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर, जिल्हा कार्याध्यक्ष, संजय भगवान निकस (पाटील), जिल्हा उपाध्यक्ष- बुडन गाडेकर, कार्यवाहक-अजय विजय वानखडे,संघटक अमोल सिरसाट, सहसंघटक रमेश समुद्रे, प्रवक्ता, अॅड. प्रजानंद गंगाराम उपर्वट, विधी सल्लागार अॅड. एम. एस. इंगळे, सदस्य इमरान खान पठाण, सुनील गवई, विमल जैन, पत्रकार विजय देशमुख, पत्रकार मुकेश ढोके, अवधूत नवले, रमेश वानखडे, साहित्यिक घुगे बंधू यांच्या सह्या आहेत.