गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
जिल्हाक्रिडा संकुलामधील व्हॉलीबॉलच्या मैदानाची दुरुस्ती रखडली;विद्यापीठ स्पर्धेच्या ऐन तोंडावर व्हॉलीबॉलपटूची होतेय दैना
लातूर :लातूर जिल्हा क्रिडा अधिकारी जगन्नाथ लकडे हे सर्वात निष्क्रिय अधिकारी म्हणुन संपुर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे कारण ही तसेच समोर येत आहेत.फेब्रुवारीत झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन लातूरने केले होते. या स्पर्धेसाठी क्रीडा संकुलात सराव करणाऱ्या खेळाडूंनीच दिवसरात्र मेहनत करीत या स्पर्धा यशस्वी केल्या होत्या. मैदानाचे परिपूर्ण काम खेळाडूंच्या मदतीनेच झाले होते.त्यावेळी करोंडाचा फंड घेण्यात आला,तेथिल मैदानाचे काम खेळाडुंकडून करुन घेवून त्यांच्यानावाने पैसे मात्र अधिकार्यांनीच लाटल्याचे बोलले जात आहे.एवढ्यावरच न थांबता आता मैदान दुरुस्ती च्या नावावरही पैसे लाटत असल्याचे चित्र दिसत आहे.
याबाबत जिल्ह्यात क्रमांक एकचा खेळ असलेल्या व्हॉलीबाॅलने अनेक दिग्गज व्हॉलीबॉलपटू दिले आहेत. या खेळाची जिल्ह्यात परंपरा आहे. मात्र, या खेळालाच सध्या घरघर लागली आहे की काय असे दिसत आहे. क्रीडा संकुलात असलेल्या व्हॉलीबॉलच्या मैदानाची दुरुस्ती पावणेदोन महिन्यांपासून रखडली असुन त्यातच आता विद्यापीठ स्पर्धेच्या ऐन तोंडावर व्हॉलीबॉलपटुंच्या सरावाचा मात्र खेळखंडोबा होत असल्याचे पहावयास मिळत आहे.
याहुन धक्कादायक बाब म्हणजे
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा क्रीडा संकुलातील व्हॉलीबॉल मैदानाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली.दोन वर्षांपूर्वीच व्हॉलीबॉल मैदान दुरुस्तीसाठी १० लाख मंजूर झाले होते. मात्र, प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. यात मैदान दुरुस्तीसह क्रीडा साहित्याची खोली, खेळाडूंना बसण्यासाठी छोटी गॅलरी, पोल बदलणे, ड्रेनेज सिस्टीम आदी कामांचा समावेश होता. मात्र, आता यात कमी करीत ७ लाख मंजूर झाले. मात्र या निष्क्रिय अधिकार्याने हा फंड दुसरिकडे वळवून व्हाॅलिबाॅल खेळाडूवर अन्याय केला असल्याचे आता उघड बोलले जावू लागले आहे एवढ्यावरच न थांबता पावणेदोन महिने उलटले तरी अद्यापही काम अपूर्णच आहे. त्यामुळे खेळाडूंच्या सरावाला खीळ बसली आहे. शालेय व विद्यापीठ स्पर्धेचा हंगाम काही दिवसांवरच येऊन ठेपला असल्याने खेळाडूंना सरावाची गरज आहे. मात्र, संकुलातील मैदान दुरुस्त नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. काही खेळाडू इतर मैदानाचा आधार घेत आहेत, तर काहींचा सरावच बंद आहे. मात्र, याचे क्रीडा विभागाला काही देणे- घेणे नसल्याचे दिसत आहे
संकुलातील व्हॉलीबॉल मैदानावर सकाळ- सायंकाळच्या सत्रात ५ ते ६ मुला- मुलींच्या क्लबच्या माध्यमातून शेकडो खेळाडू नित्यनियमाने सराव करतात. मैदान दुरुस्तीअभावी सध्या हा सराव बंद आहे. काही महिला खेळाडू या ठिकाणीच हलकासा वॉर्मअप करुन घराकडे परतत आहेत. एकंदरित, मैदान दुरुस्ती रखडल्याने खेळाडूंची गैरसोय होत आहे.अशा या गंभीर प्रकरणाकची चौकशी करुन खेळाडूला न्याय देण्याचे काम मा.जिल्हाअधिकारी यांनी करावी अशी मागणी मागणी जिल्ह्यातील खेळाडू करत आहेत.