Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

स्वातंत्र्य सैनिकाचे बोगस प्रमाणपत्र वापरून ३१ वर्षे शासकीय सेवा करून पेन्शनही घेतली

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
स्वातंत्र्य सैनिकाचे बोगस प्रमाणपत्र वापरून ३१ वर्षे शासकीय सेवा करून  पेन्शनही घेतली
••••••••••••••••••••••••••••••••••••••
मुरुड पोलीसात आरोपीसह पाठीराख्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची राजेंद्र गिरी यांची मागणी*

शिक्षण उपसंचालक मोरे आणि प्राचार्या गिरी यांच्या असहकार्यामुळे हायकोर्टात धाव--गिरी*
-------------------------------------









*(लातूर/प्रतिनिधी)*

तुळजापूर येथील रहिवासी असलेल्या किसन दत्तू गोंधळी या स्वातंत्र्य सैनिकाचे बोगस नामनिर्देशपत्र तयार करून चक्क ३१ वर्षे शासकीय सेवा करुन मुरुडच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संंस्थेतून लेखापाल पदावरुन निवृत होवून अलिकडेच पेेन्शन उचलत असलेल्या बब्रुवान बालाजी साबळे रा. मुरुड यांनी शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करत त्यांच्याविरुध्द फौजदारी संहितेनुसार विविध कलमान्वये तात्काळ गुन्हा दाखल करावा.तसेच साबळे यांच्या गैरकृत्याबद्दल, शासनाच्या केलेल्या फसवणुकी बद्दल वारंवार अवगत करुनही त्यांना साथ देणार्‍या मुरुड येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या भागीरथी गिरी यांना सहआरोपी करावे अशी मागणी राजेंद्र नेपाळबुवा गिरी यांनी मुरुड पोलीस ठाण्याचे सपोनिंकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

शिक्षण उपसंचालक मोरे आणि प्राचार्या गिरी यांच्या असहकार्यामुळे हायकोर्टात धाव--गिरी*
-----------------------------------

सतत पाठपुरावा करूनही लातुर शिक्षण उपसंचालक मोरे आणि मुरुड जिल्हा प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या गिरी मॅडम यांनी यत्किंचितही सहकार्य न केल्याने तक्रारदार गिरी यांना या सगळ्यांची मिलीभगत असल्याचा दाट संशय आल्याने आणि प्रकरण हे अत्यंत गंभीर असल्याने या गंभीर प्रकरणात अखेर राजेंद्र गिरी यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयातही ॲड.रामराव बिरादार यांच्या मार्फत याचिका (१७१८१/२०२३, दि.१२ जून २३) ही दाखल करुन संबंधितांवर कारवाईसाठी आग्रह धरला आहे.
यातक्रार अर्जात राजेंद्र गिरी यांनी विस्ताराने गंभीर आरोप नमुद केले आहे की, मुळ पारुनगर, मुरुड ता.जि.लातूर येथील बब्रुवान साबळे या चांभार जातीतील व्यक्तीने, तुळजापूर येथील भटके विमुक्त ब प्रवर्गातील किसन दत्तू गोंधळी या स्वातंत्र्य सैनिकांचे दि. ८ जानेवारी १९९४ रोजी बनावट नामनिर्देशनपत्र तयार केले. पण त्यापूर्वीच दि.९ मार्च १९९० रोजी उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांचेही नामनिर्देशनत्र तयार केले आहे. त्या आधारे दि.२२ जून १९९३ रोजी साबळे यांनी उदगीर शासकीय अध्यापक विद्यालयात सेवक पदावर प्रथम नियुक्ती मिळवली.

*तक्रारींचा पाऊस पडूनही ही अधिका-यांना अशी कोणती हाऊस आहे की तक्रारीची दखल घेतली जात नाही* 
--------------------------------
वास्तविक दि. ४ एप्रिल १९९१ च्या महाराष्ट्र शासन उपसचिवांचे परिपत्रकातील मुद्दा क्र. ४ नुसार साबळे हे गोंधळी यांच्या जवळच्या रक्ताच्या नात्यातील नाहीत आणि जातीचेही नाहीत. तरीही बनावट नामनिर्देशन पत्राधारे बब्रुवान साबळे यांनी प्रथम सेवक, नंतर अनुसूचीत जातीच्या आरक्षणातून पदोन्नतीने कनिष्ठ लिपीक, वरिष्ठ लिपीक, मुख्य लिपीक तथा लेखापाल अशा तीन पदोन्नत्या घेतल्या आहेत. या बोगस प्रकरणी दि.२६ मे २०२३ रोजी लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक,व मुुरुडच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांना आवश्यक त्या पुराव्यासह तब्बल ५ वेळा वारंवारच्या तक्रारीने अगवत करुन कायदेशीर कारवाईची मागणी केलेली आहे. त्यावर शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दि.२६ मे २०२३ रोजी लागलीच संबंधित प्राचार्यांना सदर प्रकरणी तत्काळ चौकशी करुन, वस्तुुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेशित केले होते. परंतु प्राचार्यांनी वरिष्ठांच्या या पत्राला केराची टोपली दाखवून तत्कालीन लेखापाल बब्रुवान साबळे यांना पाठीशी घालून अभय दिले. त्यानंतरही शिक्षण उपसंचालक कार्यालयाने या प्राचार्यांना तीन पत्रे देवून अहवाल मागविला होता. पण प्राचार्या गिरी यांचा नेमका एवढा काय वैयक्तिक इंटरेस्ट आहे की त्या ना तक्रारीची दखल घेत आहेत, ना वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करताहेत....?? तेंव्हा प्राचार्या गिरी यांनी कर्तव्यात कसूर करत हेतुपुरस्सर हयगय व दुर्लक्ष करत शासनाचे लाखो रुपयांचे जाणीवपूर्वक नुकसान केले आहे. ते वसुल करण्याऐवजी गिरी या साबळे यांना पाठीशी घालत आहेत. असा गंभीर आरोप राजेंद्र गिरी यांनी केला आहे.
बनावट कागदपत्राधारे सेवेत दाखल होवून, लेखापाल पदावरुन निवृत्त झालेले बब्रुवान साबळे यांच्या सेवानिवृत्तीचे रजा, रोखीकरण, गटविमा, भविष्य निर्वाह निधी व सेवेत रूजू झाल्यापासून ते सेवानिवृत्तीपर्यंतचे वेतन भत्ते यावर शासनाचे लााखे रुपये खर्च झाले असून, ते वसुल करुन शासनास जमा करावे,‌ त्यांना देण्यात येणारे सर्व लाभ रोखण्यात यावेत. तसेच पेन्शन तात्काळ बंद करावी. असे राजेंद्र गिरी यांनी प्राचार्यांना दि.९ जून २०२३ पर्यंत विविध पाच निवेदनाद्वारे कळविले होते. तरी प्राचार्यांनी संपूर्ण तक्रार पत्रांना केराची टोपली दाखवत आरोपी (ठक) बब्रुवान साबळे यांना निवृत्तीचे वेतनाचे व इतर ११ लाख २४ हजार रुपये दि.१२ जून २०२३ पर्यंत अदा केलेले आहेत. त्यामुळे साबळे यांच्या विविध फौजदारी कलमाखाली गुन्हे दाखल करावेत आणि त्यांना या प्रकरणात पाठीशी घालणार्‍या प्राचार्या गिरी यांना सहआरेापी करावे अशी मागणी राजेंद्र गिरी यांनी केली असून, खोटे नामनिर्देशन करुन ते खरे असल्याचे भासवून शासन-प्रशासनाला फसविल्या प्रकरणी शाखा अभियंता हणुमंत सिरसाट यांच्यावर अशाच एका बोगस प्रकरणात दि.२३ मार्च २०२३ रोजी भाग्य नगर, नांदेड येेथे दाखल झालेल्या गुन्ह्याची माहितीही निवेदनात दिली आहे. तरीही संबंधित प्रकरणात शिक्षण विभाग अपेक्षित असे लक्ष देत नसल्याने पोलीसांकडे धाव घेतली. परंतु तिथेही उडवाउडवीची उत्तरे आणि चलढकल करत असल्याने अखेर वैतागून तक्रारदार गिरी हे मा.उच्च न्यायालयात गेले आहेत. तेंव्हा आता न्यायालयाचा पुढील आदेशाची वाट पाहण्याशिवाय तुर्तास तरी दुसरा मार्ग नसल्याने आता प्रतिक्षा आहे ती न्यायालयीन आदेशाची.....!!.
Previous Post Next Post