आधुनिक सावित्रीनी ६० वटवृक्ष लावून वटपौर्णिमा साजरी केली.
एकाच वडाच्या झाडाजवळ गर्दी करून पूजा करण्यापेक्षा आपणच वडाच्या झाडाचे रोपण करून, त्या झाडाची पूजा करून
वटपौर्णिमा साजरी करावी ही संकल्पना घेऊन ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या महिला सदस्यांनी बसस्थानक क्रमांक दोन च्या परिसरात ६० मोठी वडाची झाडे लावले. वडाचे झाड लावून त्याची विधिवत पूजा केली. निसर्गाचे बदलते स्वरूप, वाढत असलेली उष्णता, वाढत असलेले प्रदूषण यावर मात करण्यासाठी प्रत्येक सण उत्सव झाडांसोबत साजरा करण्याची ग्रीन लातूर वृक्ष टीमची परंपरा आहे, यानुसार आज वड सावित्री पौर्णिमा निमित्ताने उत्साहाने वडाची झाडे लावण्यात आली. सर्व झाडांना भरपूर पाणी देण्यात आले. येत्या पावसाळ्यात सर्वानी पाच झाड़े लावून त्याचे संगोपन करावे असे आवाहन ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्या तुळसा राठोड यांनी केले.
ही संकल्पना व उपक्रम पूर्ण करण्यासाठी ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या ऍड वैशाली यादव, नीता कानडे, तुळसा राठोड, श्वेता लोंढे, दीपाली राजपूत, पूजा पाटील, डॉ. विमल डोळे, डॉ. वैशाली इंगोले, डॉ. मंजुषा कुलकर्णी, ऋतुजा कुलकर्णी, सौ. वेदपाठक, सौ.शिंदे यांनी परिश्रम घेतले.