शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात फराळाचे वितरण
लातूर : शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्ण , रुग्णांचे नातेवाईक व वारकऱ्यांना केळी व शाबुखिचडी अशा फराळाचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी फुंदे, शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, शहर वाहतुक पोलीस निरीक्षक कदम, सीए विजय भंडारी, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे समीर जोशी, मागासवर्गीय विभागाचे शहर जिल्हाप्रमुख बालाप्रसाद सोमाणी, ग्रामीण जिल्हाप्रमुख समाधान शितोळे, उपजिल्हाप्रमुख साहेबराव गायकवाड , नरेंद्र बोरा, सरकार ग्रुप संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ काळे,चाकूर तालुका प्रमुख सचिन काबंळे, विष्णु तांदळे, नितीन बापु महाजन , हरी भुतडा, साहेबराव गायकवाड, ओम बजाज,तसेच शहर व ग्रामीणचे शिवसैनिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संयोजकांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बालाप्रसाद सोमाणी, भागवत खंडापुरे, समाधान शितोळे, अमोल कांबळे, करणसिंग ठाकूर, सचिन वाघमारे, रोशनकुमार बोथरा, चांद शेख, सचिन कांबळे यांसह अनेकांनी परिश्रम घेतले.