वाहतुकीची शिस्त बिघडविणार्या शहरातील कॉलेजसमोरील
अतिक्रमणधारक व वाहनधारकावर तत्काळ कार्यवाही करा
भारतीय जतना पार्टी विद्यार्थी आघाडीचे वाहतूक नियंत्रकांना साकडे
लातूर दि.14-06-2023
शहरातील वाहतूक शाखेचे शहरातील अतिक्रमणे व वाहतुकीस होणार्या अडथळ्यावर नियंत्रण नसल्यामुळे लातूरकरांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शहरातील गांधी चौक, बसस्टँड समोरील बाजू, शाहू कॉलेज समोरील भाग व गंजगोलाई या भागातील रस्त्यावर जागोजागी हातगाडे तर काही ठिकाणी व्यावसायीकांचे अतिक्रमण झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना या मार्गावरून ये-जा करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या सुचनेनुसार भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीच्यावतीने शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आलेले आहे.
लातूर शहरामध्ये विविध ठिकाणी वाहतुकींच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. शहरातील गांधी चौक, बसस्टँड समोरील बाजू, शाहु कॉलेज समोरील भाग ते गोलाईपर्यंत अनेक ठिकाणी फूूटपाथवर अनाधिकृत दुकाने टाकल्यामुळे सर्वसामान्य नागरिक व वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कॉलेजसमोर व गोलाईमध्ये फू्रट स्टॉल व इतर हातगाडे अस्ताव्यस्त लावल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. तसेच शहरातील बसस्टँड क्र.01 व 02 च्या बसस्थानक चौकातून प्रवासी वाहने व इतर वाहने मार्गस्त होण्यासाठी 30ते 40 मिनीट लागतात. परिणामी जागोजागी वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे हे वाढते अतिक्रमण दूर करून शहरातील वाहतुकीला शहर पोलीसांनी शिस्त लावावी. अशा मागणीचे निवेदन भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या सुचनेनुसार भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश पवार यांनी वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक यांना दिले असून या निवेदनावर भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश पवार, निखील शेटकार, मंदार कुलकर्णी, आकाश पिटले, आदित्य फफागिरे, प्रथमेश गंभीरे, अभिजीत शिंदे, मंदार आराध्ये, अभिषेक देशमुख, अभिनंदन कांबळे, शरद भोसले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्या आहेत. विद्यार्थी आघाडीच्यावतीने देण्यात आलेल्या या निवेदनाचा योग्या तो विचार व्हावा अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल असा ईशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे.