Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

खाडगाव शिवारात तिर्रट जुगारावर धाड १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
खाडगाव शिवारात तिर्रट जुगारावर धाड १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त



लातूर प्रतिनिधी

लातूर खाडगाव शिवारातील लिंबाच्या झाडाखाली बेकायदेशिररित्या स्वतःच्या फायद्यासाठी तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवित असताना एमआयडीसी पोलिसांनी धाड टाकून ७०० रुपये, जुगाराचे साहित्य असा १५लाख ८० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत १० जणांनावर कार्यवाही केली असून ४ जण फरार झाले त्यांचा पोलिस शोध घेत आहेत
मागील सहा महिन्यांपासुन हे जुगारी गुंगारा देत होते,आमचे कोणी वाकडे करूशकत नाही या अविर्भावात हा जुगार अड्डा  राजरोस पणे चालू ढेवला होता.लातूर जिल्ह्यालगतच्या अंबाजोगाई, धर्मापुरी,  परळी, रामवाडी, धाराशिव, दवणगाव,  रेणापूर, सोनार लाईन, येथून जुगारी हे बेकायदेशिररित्या स्वतःच्या फायद्यासाठी तिरंट नावाचा जुगार खेळण्यासाठी लातूर येथे येत आहेत.एकीकडे पोलिस अधिक्षक सोमय मुंडे हे कार्यवाही करत आहेत तर दुसरी कडे मात्र अधिकार्यांच्या संगनमताने हे जुगारी राजरोसपणे दिवसाढवळया शेतात बसत आहेत.यावर आता पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांनी लगाम लावणे अवश्यक बनले आहे
मिळालेल्या माहिती नुसार खाडगाव शिवारातील कदम यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाखाली काही व्यक्ती बेकायदेशिररित्या स्वतःच्या फायद्यासाठी तिरंट नावाचा जुगार खेळत व खेत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना पोलिसांनी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास बसवाडी ते खाडगाव जाणाऱ्या रस्त्यावरील परिसरात तिरंट जुगारावर धाड टाकली.
 यात जयंद्र हरिभाऊ आपट (४८)  नवनाथ बैजनाथ फंड (३५) , आशिष गणेश हाजगुडे (२७) आदित्य राजू सूर्यवंशी (२०) ,शंकर फड (३६) , , आनंद जय अग्रवाल (३५) विशाल रामहरी कांदे (२२) , दीपक विष्णू नागरगोजे (२२) , सुरेश विश्वप्रसाद तापडिया (२७) गणेश अशोक डोंगरे
 लातूर अशी कार्यवाही करण्यात आलेल्याची   नावे आहेत तर आशिय बाळू चोर, रा. विक्रमनगर, लातूर, आकाश अण्णाराव होदाडे रा. न्यू भाग्यनगर, लातूर, संदेश ऊर्फ अण्णा शिंदे रा. लातूर, अझहर शेख रा. लातूर हे फरार झाले असून त्यांचा पोलिस शोध घेत आहेत. 
Previous Post Next Post