Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

पाचशेरुपयाच्या नवीन८८ हजार ३२ कोटी पन्नास लाख नोटा छापखान्यांतून गायब

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
पाचशेरुपयाच्या नवीन८८ हजार ३२ कोटी पन्नास लाख नोटा छापखान्यांतून गायब

पाचशेच्या नवीन नोटा रिझर्व्ह बँकेत पोहोचण्याआधीच लंपास



मुंबई :
वसुलीसाठी पुन्हा नोटाबंदी करणार का ? १९९४ मध्ये ५००, तर २००० मध्ये १ हजार रुपयांची नोट चलनात आली. सोळा वर्षे या दोन्ही नोटा व्यवहारात होत्या. मात्र, नोटाबंदीनंतर या दोन्ही प्रकारच्या सुमारे १५.३ लाख कोटी नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्या आहेत. त्यामुळे नवीन डिझाईनच्या अब्जावधी रुपयांच्या नोटा एकाच वर्षात कुठे गायब झाल्या आहेत, त्या वसूल करण्यासाठी पुन्हा नोटाबंदी करणार का, असा प्रश्न अर्थतज्ज्ञांना पडला आहे.


केंद्र सरकार काळा पैसा धुंडाळत असताना नाशिक, देवास आणि बंगळूरमधील छापखान्यांतून पाचशे रुपयांच्या १ हजार ७६१ दशलक्ष नोटा भारतीय रिझर्व्ह बँकेत पोहोचण्याआधीच लंपास झाल्या असल्याचे धक्कादायक माहिती वार्यासारखी पसरली असुन याबाबत अजित पवार यांनी पेपरचे नाव न घेता एका वृत्तपत्राने छापल्याचे उघड भाष्य करुन चौकशी करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, या कालावधीत रघुराम राजन हे गव्हर्नर होते; पण त्या नोटांवर स्वाक्षरी कोणाच्या होत्या, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

गायब झालेल्या सर्व नोटा नवीन डिझाईनच्या असून, त्याचे मूल्य अठ्ठयाऐंशी हजार बत्तीस कोटी पन्नास लाख रुपये (८,८०,३२,५०,००,०००) इतके आहे. छपाई केलेल्या नोटांपैकी ७ हजार २६० दशलक्ष इतक्याच नोटा पोहोचल्या असल्याचे खुद्द रिझर्व्ह बँकेनेच उघड केल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत खळबळ उडाली आहे.

करन्सी नोट प्रेस नाशिक, बँक नोट प्रेस देवास आणि भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रांक प्रा. लिमिटेड बंगळूर येथील करन्सी नोट छापखान्यांतून भारतीय रिझर्व्ह बँक नोटा खरेदी करते. खरेदी केलेल्या नोटांचे या बँकेकडून देशभर वितरण केले जाते.
नाशिक करन्सी प्रेसमधून एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत ५०० रुपयांच्या २१० दशलक्ष नोटा भारतीय रिझर्व्ह बँकेला पाठविल्या होत्या. एप्रिल २०१५ ते डिसेंबर
२०१६ या कालावधीत ३४५ दशलक्ष, तर एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत १ हजार ६६२ दशलक्ष नोटा पाठविल्या होत्या.
बंगळूर प्रेसमधून याच कालावधीत ५, १९५.६५ दशलक्ष आणि देवासकडून १,९५३ दशलक्ष नोटा, अशा एकूण ८,८१०.६५ दशलक्ष नोटा रिझर्व्ह बँकेला पाठविल्या असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते मनोरंजन एस. रॉय यांना कळवले आहे... मात्र, यापैकी केवळ ७,२६०

दशलक्ष नोटा मिळाल्या असल्याचे रिझर्व्ह बँकेने २०१६-१७च्या आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे. यावरून एकूण १,७६०.६५ दशलक्ष नोटा गायब असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या नोटा गेल्या कुठे, इतक्या मोठ्या प्रमाणात बेहिशेबी नोटा चलनात असताना आतापर्यंत कोणालाही समजले कसे नाही, असे प्रश्न उपस्थित होत असून, + जबाबदार अधिकारी अजूनही मोकाट असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलेजात आहे
Previous Post Next Post