Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

१८जुन रोजी छत्रपती संभाजीनगर येथे व्हॉइस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंगचे अधिवेशन

१८जुन रोजी छत्रपती संभाजीनगर येथे व्हॉइस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंगचे अधिवेशन


राज्यातील साप्ताहिकांचे मालक, संपादक आणि पत्रकारांचे राज्यव्यापी अधिवेशन रविवार, १८ जून रोजी छत्रपती संभाजी नगरात होणार आहे तरी लातूर जिल्ह्यातील पत्रकारांनी जास्तीत जास्त संखेने उपस्थित राहण्याचे आवाहन साप्ताहिक विंग चे जिल्हाध्यक्ष विष्णु आष्टीकर यांनी केले आहे

स्थळ-छत्रपती संभाजीनगरातील एमजीएम ट्रस्टमधील विनोबा भावे हॉल

पत्रकारांचा होणार  मान्यवरांच्या हस्ते सत्कार



राज्यस्तरीय या अधिवेशनाला व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, साप्ताहिक विंगचे अध्यक्ष विनोद बोरे मार्गदर्शन करणार आहेत. या अधिवेशनात साप्ताहिक विंगच्यावतीने साप्ताहिकांचे मालक, मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि पत्रकारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या के.डी वर्मा (परभणी), काकासाहेब गुटे (लातूर), सुनिल देशमुख (धाराशिव), शांताबाई मोरे (हिंगोली), डॉ. भारती मढवई (नांदेड), मुशीरखान कोटकर, (देऊळगावराजा, जि. बुलढाणा), कृष्णा हावरे (जानेफळ), सुरेश क्षीरसागर (नागपूर), सुनिल पवार (मेहकर), अनुप कुमार भार्गव (वर्धा), गणेश लवणकर (काटोल, जि. नागपूर), विकास बागडी (जालना), वैशाली चवरे (कारंजा), सुरेखा सावळे (बुलढाणा), संजय निकास (अकोला) यांचा समावेश आहे.

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील साप्ताहिकांचे मालक, संपादक आणि पत्रकारांचे राज्यव्यापी अधिवेशन रविवार, १८ जून रोजी छत्रपती संभाजी नगरात होणार आहे. राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांच्या हस्ते या भव्यदिव्य अधिवेशनाचे उदघाटन होणार आहे. व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी संदीपदादा शेळके यांचे अभिनंदन केले आहे. राज्यभरातून देखिल त्यांच्यावर अभिनंदनासह शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.  
संदीप काळे-संस्थापक अध्यक्ष, व्हॉइस ऑफ मीडिया,

छत्रपती संभाजीनगरातील एमजीएम ट्रस्टमधील विनोबा भावे हॉलमध्ये हे एक दिवसीय राज्यस्तरावरील अधिवेशन नियोजित आहे. वेगवेगळ्या सत्रांमध्ये हे अधिवेशन होणार आहे. पहिल्या सत्रात संदीपदादा शेळके यांच्या हस्ते अन् मान्यवरांच्या उपस्थितीत अधिवेशनाचे थाटात उद‌्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर साप्ताहिक विंगमधील पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात येणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील कामांचा आढावा यावेळी सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर विविध विषयांवर ठराव पारित करण्यात येतील. साप्ताहिकांच्या मालक, संपादक, पत्रकारांना अधिवेशनादरम्यान विमा कवच प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी साप्ताहिक विंगची संपूर्ण राज्य कार्यकारिणी कामाला लागली आहे. 
-
विनोद बोरे, प्रदेशाध्यक्ष, व्हॉइस ऑफ मीडिया, साप्ताहिक विंग
राजर्षी शाहू परिवाराच्या माध्यमातून संदीप शेळके यांनी राज्य अन् राष्ट्रीय पातळीवरही नावलौकिक मिळविला आहे. उद्योग, सहकार, शिक्षण आदी क्षेत्राच्या माध्यमातून त्यांनी लोककल्याण साधले आहे. सकारात्मक अन् उर्जावान व्यक्तिमत्त्व म्हणून संदीप शेळके यांची ओळख आहे. अशा कर्तृत्त्ववान व्यक्तिमत्त्वाच्या हस्ते व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे अधिवेशनाचे उदघाटन होणार आहे. त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. त्यांच्या कर्तृत्त्वाचा अभिमान आहे. आनंद आहे.




भव्यदिव्य अशा स्वरुपाचे अधिवेशन व्हावे, यासाठी साप्ताहिक विंगची पूर्ण कार्यकारिणी कामाला लागली आहे. महाराष्ट्रभरातील संपादकांचे अधिवेशन गाजणार आहे.
वामण पाठक -प्रदेश सरचिटणीस,व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग 

 

व्हॉइस ऑफ मीडिया ही पत्रकारांची अत्यंत सकारात्मक संघटना आहे. या संघटनेचे अल्पावधीतच देशभरात जाळे विणले गेले. राज्यातही या संघटनेचा सर्वाधिक बोलबाला आहे. या संघटनेचे थेट कृती कार्यक्रम विशेष भावतात. छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या संपादकांच्या अधिवेशनाला मला उदघाटक म्हणून आमंत्रित करुन माझा सन्मान वाढविल्याची बाब कायम आठवणीत राहणार आहे.

-संदीप शेळके, अध्यक्ष राजर्षी शाहू पतसंस्था






Previous Post Next Post