Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

महा-ई सेवा केंद्र व आपले सरकार केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थी व सर्वसामान्यांची लूट

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
महा-ई सेवा केंद्र व आपले सरकार केंद्राच्या माध्यमातून
 विद्यार्थी व सर्वसामान्यांची लूट 
भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीचे तहसिलदारांना साकडे


लातूर दि.09-06-2023
लातूर शहरातील तहसिल कार्यालयाअंतर्गत असणारे सेवा सुविधा केंद्र अनेक वर्षापासून बंद आहेत. परिणामी महा-ई सेवा केंद्रावर विविध प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यार्थी, पालक, व सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. याचा गैरफायदा घेत केंद्र चालक व तहसिल मधील दलाल सेतू सुविधा अंतर्गत मिळणार्‍या विविध प्रमाणपत्रासाठी मनमानी शुल्क घेऊन सर्वसामान्य नागरिक व पालकांची लूट करीत असल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे. त्यामुळे लातूर तहसिलदारांनी याकडे लक्ष देऊन महा-ई सेवा केंद्र व आपले सरकार केंद्राच्या माध्यमातून होणारी विद्यार्थी व सर्वसामान्यांची लूट तत्काळ थांबावावी अशा मागणीचे निवेदन भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या सुचनेनुसार भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीच्यावतीने लातूर तहसिलदारांना देण्यात आलेले आहे. त्यामुळे वाढत चाललेली ही लूट थांबवा अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे.
शहरातील तहसिल कार्यक्षेत्राव्यतीरिक्‍त अनेक ठिकाणी महा-ई सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत आहेत. परंतु तहसिल कार्यक्षेत्रातील मुख्य सेवा सुविधा केंद्र गेल्या अनेक दिवसापासून बंद असल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे तर महा-ई सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून उत्पन्‍न, रहिवासी, नॅशनॅलिटी या प्रमाणपत्रासाठी 200 ते 500 रूपयापर्यंतचा निधी सदरील सेवा केंद्राला द्यावा लागत आहे. तसेच रेशनकार्ड, सॉलव्हन्सी, निराधार, अपंग, विधवा यांच्या पगारीच्या फाईल करीता किमान 1000 ते 3000 पर्यंतचे शुल्क या केंद्र चालकाकडून घेतले जात आहे.
यातही तत्काळ सेवा आणि प्रशासकीय स्तरावरील सेवेनुसार दर आकारले जात आहेत. त्यातही पुन्हा एजंट व दलालाचा सुळसुळाट वाढल्यामुळे विद्यार्थी व पालकांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लातूर तहसिलच्या तहसिलदार साहेबांनी याकडे लक्ष देऊन सुरू असलेली पालक व विद्यार्थ्यांनी लूट थांबवावी आणि महा-ई सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांना तत्काळ प्रमाणपत्र देण्याची सोय करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या सुचनेनुसार भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीच्यावतीने विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश पवार यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदारांना देण्यात आलेले आहे.
या निवेदनावर मंदार कुलकर्णी, कृष्णा सारगे, मंदार अराध्ये, आकाश पिटले, प्रथमेश गंभीरे, आकाश जाधव, गौरव यादव, आदित्य फफागिरे, महादेव काळे, दीपक खाडे, संदेश कुंभार, स्वप्नील केंंद्रे, योगेश वाघमोेडे, ओम मुस्कावाड, योगेश गंगणे, यशवंत कदम, तन्मय पवार, रोहन जाधव, शहिब शेख यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.
Previous Post Next Post