गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
दारूबंदी साठी तुंगी गावातील महिलांचा धोदार पावसामध्ये एल्गार.!
ग्रामपंचायत कार्यालय तुंगी बुद्रुक तालुका औसा येथे उपस्थित महिलांनी दारू विरोधी अर्ज दाखल करून ग्रामपंचायत ठराव घेतला. तुंगी बुद्रुक येथे अवैद्य दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे. अवैद्य दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे अनेक माता-भगिनींचे, मुलांचे गावातील अबाल, वृद्ध, स्त्री, पुरुषांना खूप त्रास सहन करावा लागत आहे आणि त्यांचे कुटुंब उध्वस्त होत आहेत याचा संताप समस्त गावातील माता भगिनीला होत आहे. त्यासंदर्भात आज ग्रामपंचायत कार्यालय तुंगी येथे सरपंच, उपसरपंच ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत ठराव संमत करण्यात आला आहे. चांगभलं सेवा संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सोनाली ताई गुलबिले यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये अवैध दारू विरोधी रॅली काढण्यात आली. आजचा नंतर जर गावामध्ये कोणी अवैद्य दारू विक्री केली तर त्याच्यावर खडक कारवाई केली जाईल व गावातील समस्त महिला तर्फे औसा पोलीस स्टेशन येथे आक्रोश मोर्चा काढला जाईल. अच्छा या ग्रामपंचायत ठराव बैठकीसाठी उपस्थित ग्रामसेवक पाटील, उपसरपंच बाजीराव जाधव ,सरपंच मोहन विष्णू कावळे, शिवानी जाधव ,कल्पना घोगरे स्वाती चव्हाण, सरस्वती सूर्यवंशी, सुनिता सूर्यवंशी, तायरा बाद शेख, विजय माला अशा अनेक महिलांच्या स्वाक्षरी सही हा ठराव संमत करण्यात आला.