Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

राज्यातील पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम...IIB जनता दरबार

 राज्यातील पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम...IIB जनता दरबार 


IIB जनता दरबार : राज्यातील पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम...
लातूर : आजपर्यंत इतिहास पाहता आतापर्यंत हजारो डॉक्टर घडविणाऱ्या आणि महाराष्ट्राचा महाब्रॅण्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयआयबी इन्स्टिट्यूटमध्ये ज्या काही नवनवीन संकल्पना सुरू होतात त्या फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांना केंद्रीत ठेवुन. आज आपण पाहतोत की, कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थी व पालकांसाठी भेटीगाठी, अडीअडचणीसाठी प्रत्यक्षात डायरेक्टर भेटत नाहीत किंवा भेट होऊ शकत नाही. पण आयआयबी इन्स्टिट्यूटमध्ये प्रत्यक्ष डायरेक्टरशी समोरासमोर चर्चासत्र, अडीअडचणी, शिक्षणाबाबतीत प्रत्येक गोष्टीसाठी थेट डायरेक्टरशी संवाद साधता यावा व प्रत्येक 11वी व 12 बाबतीतच्या अडचणी दूर करण्यासाठी आयआयबी जनता दरबारची संकल्पना चालू करण्यात आली. हा राज्यातील पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम ठरत आहे.


IIB-2
आयआयबीची प्रत्येक संकल्पना ही विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेऊन व गुणवत्ता वाढण्यासाठी राबविण्यात येत असतात. याचेच नवीन उदाहरण म्हणजे "आयआयबी जनता दरबार". यामध्ये प्रत्येक दिवशी दिवसभरात क्लास संपले की, प्रत्येक विषयातील पाच प्रतिनिधींना बोलावून दिवसात घडलेल्या अडचणी व शंकांचे निरसन केले जात आहे. इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थी संख्या जास्त असल्या तरी 50/50 विद्यार्थ्यांची जम्बो टेस्ट घेण्यात येत आहे.

प्रत्येक टेस्टच्या नंतर जनता दरबारात प्रत्येक टेस्ट नंतर वैयक्तिक प्रत्येक विद्यार्थ्यांचे गुणांकन निरीक्षण, परीक्षण करून ज्या-त्या विद्यार्थ्यांचे गुणांकन वाढीसाठी लगेच पावले उचलली जात आहेत. यावर्षीच्या निकालात महाराष्ट्राचा टक्का निश्चितच वाढला आहे. तो सतत कायम रहावा , गुणवत्तेत सातत्य रहावे व यापुढे ही महाराष्ट्रातून केवळ मोठा निकालाच नाही तर ऑल इंडिया रँकर सुद्धा जास्त प्रमाणात घडावेत या दिशेने आयआयबी इन्स्टिट्यूटने आपले ध्येय निश्चित करून योग्य ती तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जनता दरबारमध्ये प्रत्येक 100 विद्यार्थ्यांची टीम करून त्या टीमला एक-एक प्राध्यापकांनी दत्तक घेतले आहे. पूर्ण दोन वर्षे NEET परीक्षा होईपर्यंत त्यांचेपूर्ण पालकत्व स्वीकारून ध्येयपूर्तीसाठी एक-एक पाऊल टार्गेटच्या दिशेने टाकन्यास तयार करत आहे.


IIB-3
जनता दरबार मध्ये प्रत्येक छोट्या, सूक्ष्म लहानात-लहान, साध्या असो मोठ्या असो प्रत्येक गोष्टीकडे आयआयबीच्या डायरेक्टर यांचे जातीने लक्ष देत आहे. यामध्ये डाऊट सोल्युशन, क्लास टाईम, नोट्स, लेक्चर, स्टडी रूम, सेल्फ स्टडी वेळ, शंका निरसन करीता वेळ वाढवून मिळणे अशा प्रत्येक गोष्टीवर बारकाईने कार्य केले जाणार आहे. दरम्यान, आगामी NEET परीक्षेच्या धर्तीवर आयआयबी जनता दरबार मोठी भूमिका बजावेल हे नक्की. 
 

"प्रत्येक पालकांसाठी विद्यार्थी, पालक व प्राध्यापक हा त्रिकोण कायम एकमेकांशी जुळलेला रहाणे आवश्यक आहे. प्रत्येक एक्झाम नंतर स्वतः टीचर आणि डायरेक्टर आपल्या भेटीसाठी, चर्चेसाठी, पेपर डिस्कस साठी, पेपर, एखादा विषय या सारख्या अडचणींसाठी उपलब्ध आहेत. आपणही आपल्या पाल्याला घेऊन प्रत्येक टेस्टच्या नंतर जनता दरबारमध्ये येऊन भेटावे. निश्चितच पुढील काळात जनता दरबार हा उपक्रम विद्यार्थी व पालकांच्या 100 टक्के पसंतीस उतरेल व विद्यार्थी, पालक आणि आयआयबी टीममध्ये पारदर्शकता राहील."
 
- प्रा. चिराग सेनमा, डायरेक्टर
आयआयबी इन्स्टिट्यूट
Previous Post Next Post