Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

महावितरण च्या बदली प्रक्रिये मध्ये कर्मचाऱ्यांवर अन्याय -संघटनेचा आंदोलनाचा ईशारा

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
महावितरण च्या बदली प्रक्रिये मध्ये कर्मचाऱ्यांवर अन्याय
-संघटनेचा आंदोलनाचा ईशारा 


     शासकीय कर्मचाऱ्यांना बदली हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा असतो. महावितरण मध्ये सध्या बदलीचे वारे वाहत आहेत. अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या चुकीच्या पद्धतीने झाल्या असून त्या अन्यायकारक आहेत. त्याविरोधात न्याय मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या वतीने आंदोलनाची नोटीस देण्यात आलेली आहे. संबंधित बदल्या पारदर्शक पध्दतीने कराव्यात अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
   महावितरण लातूर मंडळ कार्यालयातून सन 2023 ची बदली प्रक्रिया चालू आहे. सदरिल बदली प्रक्रीयेमध्ये वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकाच्या निकषानुसार बदली प्रकिया पार पडलेली नाहीत.
      मुख्यालय बदली, उपविभाग बदली विभाग बदली या सर्व प्रशासकिय, विनंती व वैद्यकीय कारणास्तव बदली बाबत. परिपत्रकामधील मार्गदर्शक तत्वांकडे केराची टोपली दाखवली आहे.
      प्रशासकीय बदलीमध्ये आवश्यक कालावधी पूर्ण न केलेल्या कर्मचाऱ्यांच्या देखील बदल्या करून प्रशासनाने त्या कर्मचान्यावर अन्याय करून कंपनीचे आर्थिक नुकसान केलेले आहे. याचा संघटना जाहीर निषेध करीत आहे.
   महावितरण कंपनीतील बदली प्रक्रिया ही कंपनी व कर्मचारी या दोन्ही घटकासाठी प्रेरक असने आवश्यक आहे. परंतु आपल्या चुकीच्या बदल्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी बदली ही मारक ठरत आहे. यामुळे कंपनीच्या कामावर व कर्मचाऱ्याचा असंतोषावर फार मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे या बदली प्रक्रीयेमूळे सर्व स्तरावर असंतोष पसरलेला आहे.
      लातूर मंडळ कार्यालयातून व्हाट्सअँप द्वारे प्रसारित केलेली बदली पात्रता संभाव्य यादी नुसार बदल्या व क्रमबद्द पद्धतीने नाहीत, विनंती बदली अर्ज केलेल्या कर्मचान्यांना त्यांची विनंती बदली अर्जाची दखल घेण्यात आलेली नाही. तसेच प्रशासकीय बदली अनुषंगानुसार विकल्प घेण्यात आलेले नाहीत व या संदर्भात लातूर मंडळ कार्यालयातील या प्रक्रीयेशी संबंधीत कर्मचाऱ्यांनकडे या विषयी विचारणा केली असता कर्मचाऱ्यांची दिशा भूल करण्यात आलेली आहे.
    चुकीच्या बदली प्रक्रियेतून अन्याय झालेल्या कर्मचाऱ्यांना न्याय नाही मिळाल्यास संघटनेच्या वतीने आंदोलने व निदर्शने केले जाणार आहे.
Previous Post Next Post