Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

पॉलिटेक्निकचे प्रवेश तीन फेऱ्यांत!जिल्ह्यात १३ तंत्रनिकेतन : ३ हजार ५०० जागांवर होणार प्रवेश प्रक्रिया

पॉलिटेक्निकचे प्रवेश तीन फेऱ्यांत!जिल्ह्यात १३ तंत्रनिकेतन : ३ हजार ५०० जागांवर होणार प्रवेश प्रक्रिया


लातूर: तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर नोकरीची हमी असल्याने विद्यार्थ्यांचा तंत्रनिकेतनकडे कल वाढला आहे. जिल्ह्यात दोन शासकीय, तर ११ खासगी तंत्रनिकेतन असून, यामध्ये जवळपास ३५०० जागा आहेत. यंदाही मागील वर्षीप्रमाणे जागांवर प्रवेश पुर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.या जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू असून, शनिवारी अर्ज करण्याची शेवटची मुदत होती. आता १९ तारखेस तात्पुरती २१ रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. तंत्रनिकेतनकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे दरवर्षी जिल्ह्यातील महाविद्यालयातील जागा पूर्ण क्षमतेने भरत आहेत. तंत्रशिक्षण सहसंचालकांच्या मार्गदर्शनानुसार अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरावर ग्रुप करण्यात आले असून, त्यांच्या अडचणी सोडविणे, मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करण्यात येत आहे.

21 जुलैला अंतिम गुणवत्ता यादी

१८ व १९ रोजी तात्पुरती आणि २१ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

ऑगस्टपासून १७ तासिका सुरु

१७ ऑगस्टपासून नियमित तासिका सुरु होणार असून, ८ सप्टेंबरपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.



जिल्ह्यात १३ पॉलिटेक्निक

जिल्ह्यात १३ पॉलिटेक्निक असून, यामध्ये ११ खासगी, तर २ शासकीय तंत्रनिकेतनचा समावेश आहे. मुलींसाठी स्वतंत्र तंत्रनिकेतन आहे.

१५ जुलैपर्यंत होती अर्जु मुदत.....

१ जुलैपासून अर्जप्रक्रिया सुरू करण्यात आली होती. १५ जुलैपर्यंतच त्यास मुदत होती. आता गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.
त्यानंतर विद्याथ्र्यांच्या जागांची माहिती जाहीर करण्यात येणार आहे.

प्रवेशासाठी तीन फेऱ्याा
पहिली फेरी : 
केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी २२ जुलैपासून सुरु होणार आहे. यामध्ये प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाकडून वेळापत्रक देण्यात आले आहे.

दुसरी फेरी ५ ऑगस्टपासून

राबविण्यात येणार आहे. १७ ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करावे लागणार आहे.

तिसरी फेरी :
१८ ऑगस्टपासून तिसरी प्रवेश फेरी सुरू होईल. २९ तारखेपर्यंत यामध्ये प्रवेश होणार आहेत. त्यानंतर प्रवेश फेरी होण्याची शक्यता कमी असून, हीच अंतिम फेरी राहणार आहे.

प्रवेश क्षमता ३ हजार ५००

जिल्ह्यात १३ तंत्रनिकेतनमध्ये ३ हजार ५०० जागा आहेत. यात शासकीय ८००, तर खासगीच्या उर्वरित जागांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांचा प्रतिसाद...

सहसंचालकांच्या सुचनेनुसा प्रवेश प्रक्रिया राबविण्यात असून, अर्ज केलेल्या विद्याथ्र्यांचे व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केले आहेत. -व्ही.डी. नितनवरे, नोडल अधिकारी 
Previous Post Next Post