गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
५००रूच्या बदल्यात २०००रू च्या नोटा बदली प्रकरणात लातूर मधील मोठे मासे लागणार गळाला..
गुन्ह्यातील आरोपींना मा.कोर्टाने दिली 13 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
५००रूच्या बदल्यात २०००रू च्या व्यापाऱ्याला नोटा बदलून देण्याचे अमिष दाखवून फसवणुकीचा प्रयत्न करणारा सराईत गुन्हेगारासह 7 जन ताब्यात घेण्यात आले होते. पोलीस ठाणे एमआयडीसी व विवेकानंद चौक यांनी संयुक्त कारवाई करत गुन्ह्यातील आरोपींना मा.कोर्टाने 13 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.या धक्कादायक घटनेने लातूर शहरात एकच खळबळ उडाली होती.या प्रकरणामध्ये आता नविन वळण घेतले असून यामध्ये लातूर मधील काही बडे मासे गळाला लागणार असल्याची एकच चर्चा चालू आहे, विशेष म्हणजे हे मासे एका पक्षाचे आणि एका बॅंकेचे डायरेक्टर असल्याने याला महत्व प्राप्त झाले आहे.त्यामुळे या प्रकरणात राजकीय वर्तुळातून दबाव वाढत असून प्रकरण दाबण्याच्या हेतूने हालचाली चालू असल्याची माहिती समोर येत आहे.आता नेमके बडे मासे कोण..?आणि यांचे कोणाकोणा सोबत अजून लागेबंधे आहेत हे लवकरच तपासामध्ये उघडे होईल.
याबाबत थोडक्यात हाकिकत अशी की,दिनांक 08/07/2023 रोजी संध्याकाळी 5 वाजण्याचे सुमारास विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस ठाणे एमआयडीसी येथील पोलीस निरीक्षक गोरख दिवे व इतर पोलीस अधिकारी व अमलदारांनी एमआयडीसी परिसरात सापळा लावून पीव्हीआर चौकात पोलिसांना मिळालेल्या माहिती मधील एक गाडी थांबवून गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये 96 लाख रुपयाची रक्कम आढळून आली. त्यासंदर्भात गाडी चालक अजिंक्य देवडा, राहणार कळंब जिल्हा उस्मानाबाद यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता काही इसमानी त्याला लातूर येथे बोलावून घेतले असून 96 लाखच्या ऐवजी 2 हजार रुपयाच्या एक कोटीच्या नोटा देतो असे अमिष दाखवल्याचे सांगितले. त्यावरून तात्काळ कार्यवाही करत सदर व्यापाऱ्याला नोटा बदलून देण्याचे अमिष दाखविणारे इसमांना तात्काळ ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या कोणत्याही नोटा नसल्याचे समोर आले. त्यावरून नमूद इसमानी त्याच्या आणखीन साथीदारासह नमूद व्यापारी अजिंक्य देवडा यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने कळंब येथून लातूरला बोलावल्याचे निष्पन्न झाले.
अजिंक्य देवडा, राहणार कळंब तालुका जिल्हा उस्मानाबाद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून
1) बालाजी एकनाथ कोयले, वय 38 वर्ष, राहणार सुरूराजपूर तालुका शिरूरअनंतपाळ जिल्हा लातूर सध्या राहणार श्रीनगर लातूर.
2) किशोर आत्माराम माने, वय 32 वर्ष, राहणार चाडगाव तालुका रेनापुर जिल्हा लातूर.
3) मेघशाम शिवाजी पांचाळ, वय 35 वर्ष, राहणार चव्हाणवाडी, तालुका गेवराई जिल्हा बीड.
4)बालाजी लिंबाजीराव रसाळकर, वय 45 वर्ष, राहणार विजापूर नाका, सोलापूर.
5) श्याम प्रल्हाद घेगरदरे , 62 वर्ष, राहणार लीलावती सदन, ओनर्क नगर, विजापूर रोड सोलापूर.
6) इमाम अहमद शेख, वय 40 वर्ष, राहणार भोकरंबा, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर.
7)संदीप जयंत शिवनीकर, वय 37 वर्ष, राहणार कोस्टल कॉलनी, होडगी रोड, सोलापूर. व इतर दोन
यांचे विरुद्ध पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 508/2023 कलम 420, 120 (ब), 511 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे एमआयडीसीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डोके हे करीत आहेत.
गुन्ह्यातील आरोपींना मा.कोर्टाने 13 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
लातूर पोलिसांच्या सतर्कतेने व अतिशय तत्परतेने केलेल्या कारवाईमुळे व्यापाराची फसवणूक होण्यापासून बचाव झाला असून पैशाचे लोभासाठी कोणीही बेकायदेशीर मार्गाने किंवा ज्यादा पैसे मिळवण्यासाठी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात येत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर श्री. भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. गोरख दिवे, पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डोके, पोलीस उपनिरीक्षक गळगटे, कराड, पोलीस अंमलदार संजय बेरळीकर, गणेश यादव, चलवाड, सहायक फौजदार जगताप, बावणे, पोलीस अमलदार देशमुख, राजपूत, गाडे, धुमाळ , सचिन कांबळे, मालवदे, मयूर मुंगळे, चिंचोलीकर, वायगावकर, बेल्हाळे, भोसले, तुरे यांनी केली आहे.