Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

५००रुच्या ९६ लाखाच्या बदल्यात २००० च्या नोटा बदल करण्यासाठी आलेल्या इसमाचा पर्दाफाश..

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
५००रुच्या ९६ लाखाच्या बदल्यात२००० च्या नोटा बदल करण्यासाठी आलेल्या इसमाचा पर्दाफाश..
प्रतीकात्मक 



एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत ५००रुच्या ९६ लाखाच्या बदल्यात २००० च्या नोटा बदल  करण्यासाठी आलेल्या इसमास पोलिसांनी पकडून पोलिस स्टेशन मध्ये आणल्याची धक्कादायक माहिती रविवार दि.९जुलै रोजी समोर आल्याने लातूर शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत काही पत्रकार हे चौकशीसाठी गेले असता पोलीस निरीक्षक यांनी एकाचा मोबाईल घेऊन त्यातील सर्व पाहून मोबाईल वापस देत आपणास चौकशी करून पूर्ण बातमी देण्यात येईल असे सांगितले असता सर्व पत्रकार तेथे जाऊन याविषयी माहिती विचारली असता आम्हाला असे वाटले की आमची चोरून माहिती कोणीतरी ऐकत आहे म्हणून आम्ही यांचा मोबाईल घेतला होता तसे काही गैरसमज करून घेऊ नका असे सांगून पत्रकारांची समज काढून सर्वांना समजावून बाहेर पाठवले यात किती रक्कम आहे याची चौकशी केली असता 96 लाखाची रोकड ५०० च्या नोटा आहेत असे सांगितले याची चौकशी चालू असून   नोटा चौकशीसाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यांच्याकडे माहिती मागून घेत आहोत सर्व चौकशी झाल्यानंतर आपणा सर्वांना बातमी पि आर ओ मार्फत मिळेल असे पोलीस निरीक्षक दिवे व डी वाय एस पी फुंदे यांनी भेटावयास गेलेल्या सर्व पत्रकारांना सांगीतले आहे.आता नेमके या प्रकरणामधील ९६लाखाची रोकड कोणाची आहे..?आणि ती कोण आणली यामागे कोणाचा हात आहे..? हे लवकरच समोर येईल परंतू यामध्ये एक विशेष बाब म्हणजे ज्याच्याकडे ५००रूच्या नोटा होत्या आणि ज्याने ५००रुच्या बदल्यात २०००रु च्या नोटा देणार होता असे दोघेही पोलिसांच्या जाळयात अडकले आहेत.
 
Previous Post Next Post