Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकणा-यास २५ हजाराचा दंड मनपाची कारवाई

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकणा-यास २५ हजाराचा दंड
मनपाची कारवाई



    लातूर/प्रतिनिधी: बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकून वाहतुकीस अडथळा करणाऱ्या नागरिकास मनपाच्या पथकाने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.नागरिकांनी बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकू नये,असे आवाहनही मनपाकडून करण्यात आले आहे.


    शहरात अनेक ठिकाणी बांधकामे सुरू असून बांधकाम करण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य रस्त्यावर पडलेले दिसून येते.यामुळे वाहतुकीस अडथळा होतो.याबाबत नागरिक पालिकेकडे तक्रारी करतात.ही बाब लक्षात घेऊन मनपाकडून सूचना करण्यात येतात.परंतु तरीही रस्ता खुला न केल्याने मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या आदेशान्वये धडक कारवाई करण्यात आली आहे.

    शनिवारी (८ जुलै) प्रभाग क्रमांक १५ मधील नारायण नगर (झुलेलाल मंदिर परिसर) येथे अशीच कारवाई करण्यात आली.या प्रभागातील दशरथ घवले यांचे बांधकाम सुरू असून बांधकामाचे साहित्य रस्त्यावर पडल्यामुळे संपूर्ण रस्ता बंद झाला होता.रहदारीस अडथळा होत होता. मनपाच्या पथकाने याची पाहणी करून संबंधिताला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.संबधितांकडून दंडाची रक्कम वसूल करण्यात आली.रस्त्यावर पडलेले बांधकाम साहित्य बाजूस करून रस्ता मोकळा करण्यात आला. क्षेत्रीय अधिकारी विजय राजुरे,स्वच्छता निरीक्षक धोंडीबा सोनवणे,सिद्धाजी मोरे व शिवाजी कूटकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.शहरातील नागरिकांनी बांधकाम करताना आपले साहित्य वाहतुकीस अडथळा होणार नाही,अशा ठिकठिकाणी ठेवावे. बांधकाम साहित्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याचे निदर्शनास आल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही मनपाकडून देण्यात आला आहे.
Previous Post Next Post