धर्मवीर औदुंबर पाटील बट्टेवार बहूउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने ४९ भाविकांना केले मोफत "काशी" यात्रेस रवाना
लातूर : प्रतिनिधी
धर्मवीर औदुंबर पाटील बट्टेवार बहूउद्देशिय सेवाभावी संस्था ही दर वर्षी देवदर्शनासाठी गोरगरिब भावीकांना तिरुपती, वैष्णव देवी पाठवत आपली सामाजिक बांधीलकी जपत आहे, त्याचप्रमाणे याही वर्षी धर्मवीर औदुंबर पाटील बट्टेवार बहूउद्देशिय सेवाभावी संस्था लातूरच्या वतीने ४९ भविकांना काशीच्या (बनारस) मोफत यात्रेस शुक्रवार दि़ ७ जुलै रोजी दुपारी १२ वाजता रवाना करण्यात आले
या संस्थेच्या वतीने लातूर शहरातून २७ भाविक तर जहिराबाद येथील केतकी संगमेश्वर येथून २२ भाविक,असे एकुण ४९ भाविक मोफत काशीच्या यात्रेस रवाना झाले आहेत़ ही यात्रा एका आठवड्याची असुन यात्रेतील भाविकांची सर्व सोय या संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे, अशी माहिती या संस्थेचे अध्यक्ष अविनाश बट्टेवार यांनी दिली़