Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

डॉ. गोजमगुंडे हॉस्पिटल मध्ये बुधडा येथील तरुणाचा हाडाची शस्त्रक्रिया करताना मृत्यु

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
डॉ. गोजमगुंडे हॉस्पिटल मध्ये बुधडा येथील तरुणाचा हाडाची शस्त्रक्रिया करताना मृत्यु 
चोकशी करण्याची रुग्ण हक्क संरक्षण समितीची पोलीस अधिक्षक यांच्याकडे मागणी





लातूर/ प्रतिनिधी- लातूर शहरातील अस्थीरोग तज्ञ डॉ किरण गोजमगुंडे यांच्या गोजमगुंडे हॉस्पिटल मध्ये दि. १७ जुलै रोजी औसा तालुक्यातील बुधडा येथील रमण आलगुले या तरुणाना हाडाचे शस्त्रक्रिया करताना मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने लातूर शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार बुधडा येथील तरुण रमण आलगुले या तरुणाचा हात मोडला असल्याने गोजमगुंडे हाॅस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले त्यानंतर तेथील डॉ किरण गोजमगुंडे यांनी तपासणी करून हाडाची शस्त्रक्रिया करण्याची अवश्यकता असल्याचे सांगीतले त्यानंतर नातेवाईकांनी होकार दर्शवून शस्त्रक्रिया करण्यासाठी सांगीतले.रुगंणाला ॴॅपरेशन थेअटर मध्ये दाखल करण्यात आल्यानंतर काही तासातचं रग्णाची तब्यत खराब होत असल्याचे सांगुन नातेवाईकांना विश्वासात न घेता पेशंटला दुसर्या हाॅस्पीटल ला हालवले आणि त्या पेशंटचा मृत्यु झाला असल्याचे सांगीतले त्यानंतर नातेवाईकांनी एकच अक्रोश केला.या मृत्यु ची चौकशी करण्यासाठी नातेवाईकांकडुन सदर रुग्णाचा मृत्यू हा अस्थीरोग तज्ञ डॉ किरण गोजमगुंडे आणि भूलतज्ञ डॉ अतिक सय्यद यांच्या निष्काळजीपणामुळे झाला असल्याचा आरोप रुग्णनातेवाईक यांनी करत दि १८ जुलै रोजी गांधी चौक पो लीस स्टेशन मध्ये रितसर तक्रार नोंदवली आहे. 
 त्यानंतर रुग्ण हक्क संरक्षण समितीने याबाबत आवाज उठवत सदर रुग्ण मृत्यू प्रकरणाची निपक्षपातीपने चौकशी करून कारवाई करावी या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक यांना रुग्णांच्या नातेवाईकांच्या विनंती वरून रूण हक संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष अँड निलेश करमुडी यांनी दिले यावेळी समितीचे पदाधिकारी आणि रुग्ण नातेवाईक यांनी अपर पोलीस अधीक्षक साहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊन चौकशी करण्याची विनंती केली यावेळी रुग्ण हक संरक्षण समितीचे महिला प्रदेश अध्यक्ष रेणुका बोरा, जिल्हा उपाध्यक्ष राम मिलमे, मयत रुग्णाचे नातेवाईक अतिश अलगुले,निवृत्ती अलगुले, विक्रम अल- गुले, रुपेश अलगुले, सुमित बोबडे, आकाश थोरमोटे, शुभम पिनाटे, बालाजी मिठापले, आदी उपस्थित होते.
Previous Post Next Post