Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

ऊसतोड मजूर व वाहन उपलब्ध करून देतो म्हणून कारखान्याची २.२२ कोटीची फसवणूक:५१ जणांवर गुन्हा

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
ऊसतोड मजूर व वाहन उपलब्ध करून देतो म्हणून कारखान्याची २.२२ कोटीची फसवणूक:५१ जणांवर गुन्हा


लातूर: शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना लीज ओंकार साखर कारखाना प्रा. लि. युनीट-२ अंबुलगा, ता. निलंगा या कारखान्यास ऊसतोड मजूर व वाहन उपलब्ध करून देतो म्हणून अनामत उचलून मजूर व वाहनाचा पुरवठा न करता २ कोटी २२ लाख ३२ हजार ५७७ रूपयांची फसवणूक केली म्हणून शिफारसकर्त्यासह ५१ जणांवर निलंगा पोलिसांत फसवणूक व अफरातफरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबुलगा येथील शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना लीज ओंकार सहकारी साखर कारखाना प्रा. लि. युनीट-२ च्या हंगाम २०२२-२३ साठी ऊसतोड मजूर व वाहन उपलब्ध करून देण्याबाबत करार केला. करार कर्त्यांना आरटीजीएस व चेकद्वारे २ कोटी २२

लाख ३२ हजार ५७७ रूपये देण्यात आले. मात्र, संबंधीत ठेकेदार, मजूर, शिफारसकर्ते यांनी वाहन व मजूर पुरवठा न करता कारखान्याची वरीलप्रमाणे फसवणूक केल्या प्रकरणी कारखान्याचे व्यवस्थापक सागर दिनकर मार्तंडे यांच्या फिर्यादीवरून निलंगा पोलिसांत ५१ जणांच्या विरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये संबंधीत ठेकेदार व मजूर यांना ठेका द्यावा अशी शिफारस करणारे रावसाहेब संदीपान देशमुख रा. वकीलवाडी, ता. केज व बाळकिशन चौहान रा. वागदरातांडा, ता. गंगाखेड यांच्यासह ५१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर, बीड, परभणी आदी जिल्ह्यातील हे मजूर अथवा पुरवठादार आहेत. या प्रकरणी निलंगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेजाळ हे अधिक तपास करीत आहेत.
Previous Post Next Post