Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

शोशल मेडिया साईटवरुन पार्ट टाइम कामातून पैशाचे आमिष..७१२ कोटी रुपयांचा च' चिनी घोटाळा उघड

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
शोशल मेडिया साईटवरुन पार्ट टाइम कामातून पैशाचे आमिष..७१२ कोटी रुपयांचा च' चिनी घोटाळा उघड

हैदराबाद : ई-कॉमर्स वेबसाइटवर विविध उत्पादनांचे बनावट रिव्ह्यू टाकण्याचा एक मोठा चिनी घोटाळा उघडकीस आला आहे. हा तब्बल ७१२ कोटी रुपयांचा घोटाळा असून देशभरातून याप्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

चीनमध्ये बसलेल्या लोकांच्या इशाऱ्यावर हे लोक काम करीत होते. या प्रकरणाचा हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेसोबतही संबंध असल्याचे आढळले आहे. त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.हैदराबादच्या पोलिसांनी एका फसवणुकीच्या प्रकरणात तक्रार दाखल केली होती. त्याच्या तपासातून हा संपूर्ण घोटाळा उघडकीस आला.

६५ बँक खात्यांची माहिती आरोपींनी चिनी ऑपरेटरला दिली होती.१२८ कोटी रुपये त्यातून पाठविले होते.
५८४ कोटी रुपये दुबईला पाठवून ते क्रिप्टो करन्सीमध्ये बदलण्यात आले.


कशी होत असे फसवणूक?

लोकांना रिव्ह्यू करण्याठी पार्ट टाइम कामाची ऑफर मिळते. त्यावर विश्वास ठेवून लोक नोंदणी करतात.
■लोकांकडून रिव्यू आणि क्रिप्टो करंसी च्या नआवआखआलई फेसबुक, ट्विटर, टेलीग्राम या सोशल नेटवर्किंग साइट्स च्या माध्यमातून पार्ट टाइम कामाची ऑफर देवून जाळयात ओढले जात होते
■ या लोकांकडून सुरुवातीला गुंतवणुकीच्या नावाखाली हजार रुपये • मागितले जातात. तक्रारकर्त्या व्यक्तीला सुरुवातीला ८०० रुपये नफा झाला. त्यानंतर त्याने २५ हजार रुपये गुंतविले. त्यावर २० हजारांचा फायदा झाला.

■ मात्र, ही रक्कम काढण्याची परवानगी मिळाली नाही. उलट आणखी पैसे मागितले, असे करून त्याने २८ लाख रुपये गुंतविले; पण हे पैसे त्याला परत मिळाले नाही.अशा हजारों लोकांना या टोळीने फसवल्याचे आता उघड झाले आहे
Previous Post Next Post