Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर मध्ये अवतरला तोतया न्यायाधीश आणि त्याला मिळाले पोलिसांचे संरक्षण

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लातूर मध्ये अवतरला तोतया न्यायाधीश आणि त्याला मिळाले पोलिसांचे संरक्षण
लातूर-)दोन दिवसांपूर्वी लातूर शहरात एक विचित्र घटना घडली आहे.एक तरुण मी कौटुंबिक न्यायालयाचा न्यायाधीश आहे म्हणून पोलीस ठाण्यात आला , पोलिसांनी अक्षरशः त्याला त्याचे म्हणणे खरे समजून एक पोलीस गाडी दिली, त्याला बॉडीगार्ड दिला. तो तोतया न्यायाधीश जिल्ह्यातील शिवनखेड खुर्द तालुका अहमदपूर या आपल्या मूळ गावी गेला आणि एका राजकीय पक्षाच्या नेत्यासोबत सुमारे दीड कोटी रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन सोहळ्यास उपस्थिती लावली. मीरअली युसूफअली सय्यद वय 32 सध्या राहणार इंडिया नगर लातूर व मूळ राहणार शिवनखेड खुर्द तालुका अहमदपूर .या तोतया न्यायाधीशाने लातूरच्या एका पोलीस निरीक्षकाला फोन करून मी कौटुंबिक न्यायालयाचा न्यायाधीश आहे म्हणून त्यांचेकडे शासकीय वाहनाची मागणी केली, आश्चर्य म्हणजे त्या पोलीस निरीक्षकाने सदर तोतया न्यायाधीशाला एमएच २४ ए डब्ल्यू 93 36 क्रमांकाचे पोलीस वाहन दिले. सोबत एक बॉडीगार्ड दिला. हा तोतया न्यायाधीश शिवनखेड खुर्द तालुका अहमदपूर येथे आपल्या मूळ गावी गेला,त्या ठिकाणी त्याने आमदार बाबासाहेब पाटील यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमास उपस्थिती लावली,त्यावेळी एक कोटी दहा लाख रुपये खर्चाच्या विकास कामाचा शुभारंभ ही तिथे केला त्या ठिकाणी त्या तोतया न्यायाधीशाचे जाहीर स्वागत करण्यात आले. त्यानंतर गावातील काही नागरिकांना सय्यद याची तोतया गिरी लक्षात आली, तो न्यायाधीश नाही असे लक्षात आले दरम्यान लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांना त्याची बतावणी लक्षात आली न्यायाधीश पदाबाबतही शंका आली त्यानंतर तातडीने त्यास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आणि पोलीस ठाण्यात भादवी 170 417 419 420 अन्वये त्याचेवर गुन्हा दाखल केला.त्याचेकडून तो वापरत असलेले खाजगी वाहन एमएच ४६ एक्स ६६२७ हेही जप्त करण्यात आले आहे. याबाबत आश्चर्य म्हणजे त्या तोतया न्यायाधीशाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकाला फोन केला आणि त्यांनी त्याचे म्हणणे खरे समजून अक्षरशः त्याला पोलिसांचे वाहन मदतीला दिले,आणि एक बॉडीगार्ड दिला. आतापर्यंत आपण एखादा तोतया पोलीस सांगून लुटणारा व्यक्ती असं ऐकलं असेल पण लातूरात काल पहिल्यांदाच तोतया न्यायाधीश भासऊन पाहुणचार घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तो अटकेत आहे.
Previous Post Next Post