गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
शिवाजी नगरचा 'महाराज' घेतो 'मटका' त्याला लागलाय पैशाचा चटका!
लातूर-लातूर शहरामध्ये कोण काय करेल याचा नेम राहिला नाही,मटका,जुगार,आणि गुटखा याचे जाळे न कळण्यासारखे विनल्या गेले आहे,यामधील ज्या 'गुरुजी'च्या नावावर मटका चालतो तो सध्या अंडरग्राऊंड असून आपले सर्व एजंटांना तो शेजारच्या राज्यात बसुन चालवत असल्याचे उघड बोलले जात आहे.त्याने लावलेल्या मटक्याचा खेळ मात्र आता युवकांमध्ये रोज खेळला जावू लागला आहे यामध्ये एजंट मात्र मालामाल होत आहेत.अशा या पैशाचा 'चटका' लागलेला आता शिवाजीनगर चा 'महाराज'उतरला असून तो एक पोलिस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.दयानंद गेट च्या जुन्या रेल्वेलाईन जवळ एका दुकानाच्या बाजुस 'एजंट'बसवून राजरोसपणे मटक्याच्या नावावर पैसे गोळा करत असल्याचे तेथील नागरिकांकडून आता उघड बोलले जावू लागले आहे.तो 'एजंट'या महाराजाला पैसे गोळा करून देत असून बाजुलाच काॅलेज असल्यामुळे येणार्या जाणार्या विद्यार्थांचे या मटक्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे, किंबहुना त्या मुलांना या मटक्याची सवही लागण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या गंभीर प्रकरणाकची चौकशी पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांनी करून त्यावर योग्यती कार्यवाही करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होवू लागली आहे.