मातंग आक्रोश मोर्चा विविध मागण्यासह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला
लातूर - प्रतिनिधी : आक्रोश महामोर्चाचे आयोजन दि. 05 जुलै 2023 रोजी सकाळी 11.00 वा. करण्यात आले आहे. हा मोर्चा साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे चौक येथून निघून गंजगोलाई गांधी चौक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाला आहे. दलित समाजावर वाढत जाणारे अन्याय, अत्याचार तसेच मातंग समाजातील वाढते दारिद्र्य शिक्षणाचा अभाव इत्यादी प्रश्नांना घेवून हा मोर्चा होता मोर्चात मातंग समाजासह दलित बहुजन समाजाने सहभागी झाले होते मातंग आक्रोश मोर्चा समन्वय समितीचे अध्यक्ष पदाधिकारी तसेच मा. राजाभाऊ सुर्यवंशी (मुबंई) मा.आनंद भाई वैरागे मा. राजेद्र लोदगेकर जी. ए. गायकवाड उत्तम राव दोरवे बाबुराव आंबेगावे पंडित सुर्यवंशी अकुंश गायकवाड नारायण कांबळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आक्रोश मोर्चा यशस्वीरित्या संपन्न झाला.