गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह चाळे करताणाचा व्हिडीओ व्हायरल
भ्रष्टाचाराची मोठमोठी प्रकरणे समोर आणून विरोधी पक्षातील नेत्यांच्या नाकीनऊ आणणाऱ्या किरीट सोमय्या यांचाच ऐन अधिवेशनकाळात आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ऐन अधिवेशनकाळात हा व्हिडीओ माध्यमांसमोर आल्याने त्यावरून वादंग होण्याची शक्यता आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीने किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित केला आहे. त्यात सोमय्या एका महिलेसोबत सेक्सचॅट (अश्लिल संभाषण ) करताना दिसत आहेत. अशाप्रकारचे आणखी तीन डझन व्हिडीओ पब्लिक डोमेनमध्ये असल्याचा दावा या वाहिनीने केला आहे. त्यामुळे राज वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, विरोधकांनी सोमयां यांच्यावर टीकेचे बाण सोडण्यास सुरुवात केली आहे.