राज-उद्धव एकत्र येणार?; मनसेचा ठाकरे गटाकडे युतीचा प्रस्ताव
मुंबई : महाराष्ट्रात उडालेल्या राजकिय खळबळीने संपुर्ण राजकारण ढवळून निघाले आहे.कोण कोणा पक्षात जाईल त्याचे आता कोणतेच समीकरण उरलेले नाही, राजकीय विश्लेशक असो कि पत्रकार यांचे सर्व सुत्रांनी आत्महत्या केल्यासारखे दिसत आहे.विशेष म्हणजे कोण काय म्हणाले यावरही तिळ मात्र विश्वास राहिला नाही किंबहुना अशा बातम्या देणे सुध्दा आता पटण्यासारख्या नाहित परंतू जे चालू आहे ते समाजासमोर मांडणे हे मिडियाचे काम आहे आणि त्याच कामा मुळे हि बातमी आपल्या समोर देत आहोत. मनसेकडून उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मनसेकडून हा प्रस्ताव दिला असल्याची माहिती आहे. मनसे नेते अभिजित पानसे हा प्रस्ताव घेऊन गेल्याच्या चर्चा सुरू आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासोबत मनसे नेते अभिजित पानसे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. यावेळी त्यांच्यात युतीचा प्रस्ताव दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.