प्रमोद गायकवाड यांनी तहसिलदार पदाचा पदभार स्वीकारला.....
आष्टी : आष्टी जि. बीड येथील रिक्त झालेल्या तहसिलदार पदाचा पदभार प्रमोद श्रीराम गायकवाड यांनी काल स्वीकारला. बीड येथे सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून ते मागील दोन महिन्यापासून कार्यरत होते.
गायकवाड यांनी यापूर्वी छत्रपती संभाजी नगर तसेच खुलताबाद येथे कोरोना काळात नायब तहसिलदार म्हणून आपल्या प्रशासकिय कार्याची छाप पाडली होती. गायकवाड यांनी लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयातून बी ए पदवी प्राप्त केली आहे. माझं लातूर या सामाजिक परिवाराचे ते क्रियाशील सदस्य आहेत. आष्टी तहसिलदार म्हणून काल पदभार स्वीकारला त्यावेळी त्यांचा तेथील अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. आष्टी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या मुलभूत समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मत या सत्काराला उत्तर देताना नवनियुक्त तहसिलदार गायकवाड यांनी व्यक्त केले.