Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर पोलीस दलात २६ अधिकाऱ्यांच्या बदल्या

लातूर पोलीस दलात २६ अधिकाऱ्यांच्या बदल्या

७ पोलीस निरीक्षक, ६ पोलीस उपनिरीक्षक आणि १३ सहायक पोलीस निरीक्षकांना बदलले



लातूर : प्रशासकीय बदल्या आणि विनंती बदल्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील २६ पोलीस अधिकाऱ्यांची खांदेपालट करण्यात आली आहे. यात ७ पोलीस निरिक्षक, ६ पोलीस उपनिरिक्षक आणि १३ सहायक पोलीस निरिक्षकांचा समावेश आहे. जिल्हास्तरीय पोलीस अस्थापना मंडळाच्या बैठकित बुधवारी (दि.५) या बदल्यांचे निर्णय घेण्यात आले.
मे-जून महिन्यात झालेल्या प्रशासकीय
बदल्यानंतर जिल्ह्यात रुजू झालेले पोलीस अधिकारी व जिल्ह्यांतर्गत पोलीस ठाणे प्रमुखांची आदलाबदल बैठकित करण्यात आली. त्या अनुषंघाने सध्या नियंत्रण कक्षात असलेल्या ७ पोलीस निरिक्षकांना जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये नियुक्त करण्यात आले. बात, पोलीस नियंत्रण कक्षातील सुधाकर राम देडे यांची अहमदपूर पोलीस ठाण्यात विठ्ठल शिवाजी दराडे यांची शिरुर अनंतपाळ पोलीस ठाण्यात साहेबराव दगडोबा नरवाडे यांची चाकूर पोलिस ठाण्यातपोलीस ठाण्यात, विष्णुकांत तुकाराम गुट्टे यांची देवणी पोलीस ठाण्यात, अशोक आबासाहेब अनंत्रे यांची रेणापूर पोलीस ठाण्यात, सुनिल हणमंतराव रेजीवाड यांची औसा पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. तर, चाकूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या बालाजी महादु मोहिते यांची बदली पोलीस कल्याण विभागात करण्यात आली आहे.
१३ सहायक पोलीस निरिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून यामध्ये पोलीस कल्याण विभागातील बाळासाहेब मनोहर नरवटे यांची मुरुड पोलीस ठाण्यात, उदगौर शहर पोलीस बुधवारी जिल्हास्तरीय पोलीस अस्थापना मंडळाच्या ठाण्यातील भिमराव शंकरराव गायकवाड यांची चाढवणा (बु) पोलीस ठाण्यात, औसा पोलीस ठाण्यातील ज्ञानदेव प्रल्हाद सानप यांची गातेगाव पोलीस ठाण्यात वाढवणा (बु) पोलीस ठाण्यातील नौशाद पाशा पठाण यांची लातूरच्या गांधी चौक पोलीस ठाण्यात मुरुड पोलीस ठाण्यातील धनंजय सावताराम ढोणे यांची जिल्हा विशेष शाखेत
गातेगाव पोलीस ठाण्यातील अशोक बालाजी घारगे 
यांची लातूरच्या विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यातील राहुलकुमार रामेश्वर भोळ यांची औसा पोलीस ठाण्यात, स्थानिक गुन्हे शाखेतील व्यंकटेश सुग्रीव आलेवार यांची लातूरच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यातील दिपाली विश्वास गिते यांची लातूर ग्रामीण वाचक शाखेत, अहमदपूर पोलीस ठाण्यातील विठ्ठल किशनराव दुरपडे यांची पोलीस अधिक्षक कार्यालयातील वाचक शाखेत रेणापूर पोलीस ठाण्यातील क्रांती संदीपान निर्मळ यांची टीएमसी लातूर येथे, सायबर पोलीस ठाण्यातील सुरज सिद्राम गायकवाड यांची अ.पो.अ. लातूरच्या वाचक शाखेत, टीएमसी लातर येथील बालाजी मारोती तोटेवाड यांची अहमदपूर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.तर सध्या भरोसा सेल येथे नियुक्त असलेले सपोनी दयानंद पाटील करण्यात आली आहे... यांच्याकडे सायबर सेलचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.
 तसचे जिल्ह्यातील ६ पोलीसउप निरिक्षकांच्या बदल्या करण्यात आला असून यामध्ये लातूरच्या गांधी चौक पोलीस ठाण्यातील व्यंकट बापुराव कव्हाळे यांची बदली भादा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शिरुर अनंतपाळ पोलीस ठाण्यातील जिलानी बशीरसाब मानुल्ला यांची बदली रेणापूर पोलीस ठाण्यात पोलीस ठाण्यात,दहशतवाद विरोधी पथक येथील शैलेश शिवाजीराव जाधव यांची बदली उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. वाहतुक नियंत्रण शाखेतील अय्युब गफुरसाब शेख यांची बदली दहशतवाद विरोधी पथक लातूर येथे करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील (सलग्न) भगवान कुंडलिकराव मोरे यांची बदली लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर, लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यातील (संलग्न) तानाजी व्यंकटराव पाटील यांची बदली शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
बदली आदेशातील सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ संबंधीत ठिकानी हजर होवून कार्यभार स्विकारावा असे या आदेशात नमुद करण्यात आले आहे



Previous Post Next Post