Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

५००रु च्या नोटाच्या बदल्यात २०००रू च्या नोटा देतो म्हणुन कमीशन च्या लालसेपोटी कळंबच्या व्यापार्याला ९६ लाखाला फसविले

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
५००रु च्या नोटाच्या बदल्यात २०००रू च्या नोटा देतो म्हणुन कमीशन च्या लालसेपोटी कळंबच्या व्यापार्याला ९६ लाखाला फसविले 
लातूर,सोलापूर,उस्मानाबाद मधील आठ जणांनवर गुन्हा दाखल
प्रतीकात्मक 


पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी २०००रू च्या नोटा बंद करण्यात आल्याचे सांगीतले आणि याबाबत आर बी आय ने बॅंकेमध्ये नोटा जमा करण्यासाठी काही नियम लावले आहेत,त्यासाठी ३०सप्टेंबर हि शेवटची तारीख असणार  असल्याचे सांगीतले तो पर्यंत ह्या नोटा चलनामध्ये काही व्यापारी आडवणूक करुन सर्वसामान्य जनतेला लुटत आहेत,काही व्यापार्यांनी या नोटांचा कमीशन साठी बाजार मांडला आहे.ज्यांच्याकडे ह्या नोटा मिळकतीपेक्षा जास्त आहेत ते अशा लोकांकडून हे एजंट कमीशनच्या लालसेपोटी व्यापार्यांना फोन करून आमच्याकडे २०००रू च्या नोटा आहेत त्याबदल्यात ५००रू च्या नोटा द्या असे म्हणून ग्राहक शोधत असतात,जवळ एक रुपयाही नसताना हे एजंट बिनदिक्कत पणे शहरामध्ये वावरताना दिसत आहेत त्यामधलाच हा प्रकार उघडकीस आला असून कळंबच्या व्यापार्याला ५००रू च्या ९६लाख रुपयांना फसवण्यात आले आहे.याप्रकरणांमध्ये आरोपी कडे २०००रु ची एकही नोट नव्हती हे विशेश...याप्रकरणांमध्ये विशेष बाब म्हणजे शनिवारी रात्री विवेकानंद पोलिसांनी धाड टाकून आरोपींंना एम आय डी सी पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आले परंतू शनिवार पासून रविवारी रात्री पर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता याबाबत एका पत्रकारांना कुनकुन लागताच त्याने पोलिस स्टेशन गाठले परंतू त्याजवळील मोबाईल काढून घेवून दोन घंटे पोलिस स्टेशन मध्ये बसवण्यात आले याबाबत बातम्या प्रकाशित झाल्याने एकच खळबळ उडाली आणि शेवटी वरिष्ठांनी पुढाकार घेवून पत्रकारांना समजविन्यात आले त्यानंतर पोलिसांनी आठ जणांनवर गुन्हा दाखल केला.याप्रकरणांनंतर पत्रकारांवर पुन्हा अशा प्रकारे पोलिसांकडून वागणूक देण्यात येवू नये याबाबत पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांनी लक्ष द्यावे.
लातूर : आमच्याकडे २ हजार रुपयांच्या एक कोटी रुपयांच्या नोटा आहेत. त्या बदलून ५०० रुपयांच्या नोटा हव्या आहेत. एक कोटीच्या २ हजारांच्या नोटांपोटी आम्हाला ९६ लाख रुपये द्या, वरचे चार लाख रुपये तुम्हाला नफा होईल, असे आमीष दाखवून कळंबच्या एका व्यापाऱ्याची ९६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना लातूरच्या एमआयडीसी परिसरातील पाण्याच्या टाकीसमोरील गोदामापुढे शनिवार, ८ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोलापूरचे तिथे बीडचे दोघे, कळवचा एक व लातूरचे इतर अशा आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळंब येथील व्यावसायिक अजिंक्य अभय देवडा यांना लातूरसह सोलापूरच्या आठजणांनी फोन करून आमच्याकडे दोन हजार रुपयांच्या एक कोटी रुपयांच्या नोटा आहेत, त्या बाजारात चालत नाहीत, एकाचवेळी एवढ्या नोटा बदलून मिळत नाहीत, तुम्ही व्यावसायिक आमच्याकडील दोन हजार रुपयांच्या एक कोटी रुपयांच्या नोटा आम्हाला बदलून ५०० रुपयांच्या नोटा द्या, त्या बदल्यात आम्ही तुम्हाला १ कोटी रुपये देतो, आम्हाला केवळ ९६ लाख रुपये द्या, अशी बतावणी केली. या आमीषाला बळी पडून कळंबचे व्यावसायिक अजिंक्य देवडा हे ५०० रुपयांच्या नोटा असेलेले ९६ लाख रुपये घेऊन लातूरला आले. त्यावेळी आरोपी मयूर धोका (रा. कळंब, जि. उस्मानाबाद), श्याम घोगरदरे, संदीप शिवणीकर, बालाजी रसाळकर (तिघेही रा. सोलापूर), मेघश्याम पांचाळ (रा. चव्हाणवाडी, ता. गेवराई), इमाम शेख (रा. भोकरंबा, ता. रेणापूर), किशोर माने (रा. चाडगाव, ता. रेणापूर) व बालाजी कोयले (रा. लातूर) यांनी फिर्यादी अजिंक्य देवडा यांना एमआयडीसीतील पाण्याच्या टाकीजवळील गोदामाजवळ बोलावून घेतले. देवडा यांनी आणलेल्या ५०० रुपयांच्या नोटांचे ९६ लाख रुपये त्या आठ आरोपींनी काढून घेतले. त्याबदल्यात १ कोटी रुपयांच्या २ हजार रुपयांच्या नोटा दिल्याच नाहीत. त्यांनी तेथून पोबारा केला. आपली फसवणूक झाल्याचे व्यावसायिक देवडा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. आरोपींविरोधात फिर्याद दिली. याप्रकरणी देवडा यांच्या फिर्यादीवरून वरील आठ आरोपींविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. घटना मोठी असल्याने लातूर शहरचे उपविभागीय पोलीस अधिकारी फुंदे हे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तळ ठोकून आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणातील आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत 
Previous Post Next Post