Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

गुरु झाला हतबल स्थिती झाली केविलवाणी ..!!

गुरु झाला हतबल स्थिती झाली केविलवाणी ..!!



नेमके कोणत्या व्यक्तीला गुरु नी शिष्य बनवावे. हेच समजत नाही. शिष्य सगळे आप-मतलबी स्वार्थी झालेले आहेत. 
त्याच्या मते गुरूच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांचे अस्तित्व संपवल्या शिवाय आपला उद्धारच होऊ शकत नाही असा काहीसा समज सर्वच शिकणार्‍या शिष्या मध्ये झालेला आहे.
त्यामुळे जेथे तिथे गुरूच्या पाठीत खंजीर खुपसण्याचेच एक कलमी काम केले जात आहेत. आपण नेमके कोणता संदेश देत आहोत आताच्या येणार्‍या पिढीला. याचा विचार झालाच पाहिजे.मित्रानो सध्याचे युग म्हणजे गुरू वर सूड उगवणारे युग आहे. शिष्य एवढे स्वार्थी,कपटी आणि भ्रष्ट नीतीचे झाले आहेत की त्यांना गुरू बद्दल आदर आपुलकी या संवेदना राहिलेल्या नाहीत. गरज़ सारी वैद्य मरो या संकल्पनेवर अतिशय क्लेशदायी रोगील वातावरण निर्माण झालेले आहे. सत्तेसाठी लोकांच्या भावनेचा विचार न करता केवळ गुरूच्या विरोधात षडयंत्र रचून त्यानाच हद्दपार करण्यात येत आहे. या गलीच्छ राजकारणाचा जनतेला वीट आला आहे.
यामुळेच गुरू शिष्य नात्याला काळिमा फासली जात आहे. 
शिष्य याच्या मनात एकच गोष्ट ठासून बसलेली आहे. 
आपला अस्तित्व व उद्धार निर्माण करायचा असेल तर गुरूच्या विरोधात षडयंत्र रचून त्यांनाच नामशेष करा. त्याच्या शिवाय आपले अस्तित्व निर्माणच होणार नाही. हाच एकमेव संदेश संबंध देशात चाललेला आहे.कारण जगात ताका जाऊन भांडी लपवणारी गांडुळाची औलाद जन्माला येत आहेत. 
तत्त्व निष्ठा या शब्दाला फारसे महत्व राहिले नाही. 
देशात अनाथाश्रम संख्या वाढविण्याचे एकमेव कारण तेच आहे.
त्यामुळे प्रत्येक शिष्य आपल्या गुरु विरोधात कूटनीती खेळून त्यांनाच संपविण्याचा प्रयत्नात आहे. 
आमच्या युगात शिष्याला गुरूची जाणीव नाहीच. गुरूला गुरू दक्षिणा म्हणजे पाठीत खंजीर ...
त्यामुळे गुरुला देखील आता धास्ती बसली आहे. 
आपन आपले सर्व शिकवून उद्या तेच शस्त्र आपल्याला संपविण्यासाठी वापरले जाणार असेल तर कोणता गुरू शिष्य बनविण्यासाठी सज्ज होईल. 
शिष्य देखील आपले सर्व शिक्षण संपले की पुन्हा कधीच त्या गुरू कडे डूकुन ही पाहत नाहीत. 
गुरु पौर्णिमेच्या दिवशी एक संदेश टाकून त्याच्या बद्दल कृतघ्नता व्यक्त करतात परंतु त्यांच्या घरी जाऊन त्याची विचारपूस करण्यास देखील त्याला वेळ नाही. 
ज्या गुरु कडे दिवस दिवस बसुन आपन आपले अस्तित्व निर्माण केले. त्यांना भेटण्यास वेळ मिळत नसेल तर कोणता अभिमान त्या गुरूने त्या शिष्या बद्दल बाळगावा सांगा बर. 
जसे मांजर आणि वाघाची गोष्ट सांगितली होती.
शेवटी तिच्या युक्ती चातुर्य मुळेच तिचा जिव वाचला.
गुरु असे केले तरच घात होणार नाही झालाच तर आपन त्याला सावध पणे उत्तर देऊन त्याला त्याची औकात दाखवू...
शेवटी स्वतःच्या बेनामी संपत्तीचा कार्यवाहीच्या धास्तीने स्वार्थासाठी बचाव करायचा म्हणून गद्दारी करायची आणि राज्याच्या विकासासाठी एकत्र आलोच्या शेंबडे कारने देऊन राज्याची अब्रू एशिला टांगायची. 
या सर्वानी गद्दारी कोणाशी केली माहिती आहे ज्याने यांना राजकारणात आणले. 
त्याच गुरूशी म्हणून मी म्हणालो ज्या गुरूने जवळ घेतले त्याच्या पाठीत जे बाण होते ते सर्व त्यांनी जवळ केलेल्या सर्वत्र विश्वासू मित्रांचेच...
यामुळे गुरु शिष्य हे नाते आता अविश्वासाचे झाले आहे. 
कोणत्याही व्यक्तीला जवळ करताना संशय निर्माण होतो आहे.एवढे घबराटीचे वातावरण या घातकी लोकांमुळे झाले आहे. 
तर मित्रानी गुरूला कमीतकमी महिन्यातून एकदा तरी भेटण्याची तसदी घेतली तर त्याच्या भेटण्याने आपणास प्रत्येक क्षणाला चुकीच्या गोष्टी करण्यास पायबंद बसेल. 
त्यांमुळे सतत चांगल्या आणि जीवनात प्रेरणादायी कार्य करण्यास उत्साह निर्माण होईल. 
प्रत्येक क्षणाला आपणास मार्गदर्शक म्हणून त्याचे वेळोवेळी लाभेल.
त्यामुळे अडचणीच्या वेळेला आपला निर्णय चुकणार नाही. 
शेवटी शिष्य कितीही मोठा झाला तरी तो गुरू पेक्षा श्रेष्ठ कधीच होऊ शकत नाही. 
परंतु आता वेळ आली आहे गुरु देखील शिष्याला शिकवताना काही हाच्छे ठेवून राहिले पाहिजे. हेच आजच्या गुरु पौर्णिमेचा सत्य आहे. 
जगातील सर्वात मोठा गुरु म्हणजे बाप त्यानंतर बाकी सर्व..

सत्य पचनी पडत नाही..
 
अप्पांचा अलभ्य लाभ !!
Previous Post Next Post