गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
भीमाशंकर मंदीराच्या बाजुस चालू असलेल्या जुगार अङयावर छापा; सात आरोपी अटकेत.साडे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त.
गांधी चौक पोलीस ठाण्याची मोठी कामगिरी,
लातूर प्रतिनिधी.
लातूर शहरातील गाव भागातील भीमाशंकर रोडवर जुगार खेळणाऱ्यांवर गांधी चौक पोलिसांनी रविवार दिनांक 9 जुलै 2023 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कारवाई केली. यामध्ये तब्बल 3 लाख 62 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याबाबत पो.ह. दामोदर माणिक मुळे यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लातूर गांधी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अमलदार पेट्रोलिंग करत असताना त्यांना गाव भागातील भीमाशंकर मंदिराच्या रोडवर काही जण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे अचानक छापा मारुन कारवाई केली.
यामध्ये आरोपी 1. आदिल रशीद इनामदार वय 31 वर्ष रा. सुळ गल्ली लातुर 2. मुज्जफर सलीम शेख वय 33 वर्ष रा. तेली गल्ली लातुर 3. असलम इसाक शेख वय 30 वर्षे रा. तेली गल्ली लातुर 4. मोशीन तैमुर शेख वय 30 वर्षे रा. तेली गल्ली लातुर 5. इमाम राजा सयद वय 26 वर्षे रा. सुळ गल्ली लातुर 6. नबीसाब गफार शेख वय 29 वर्षे रा. तेली गल्ली लातुर 7. जलाल इस्माईल शेख वय 28 वर्षे रा. तेली गल्ली लातुर हे तीन पत्ती म्हणजेच तिर्रट नावाचा जुगार खेळताना आढळून आल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.या कारवाई वेळी नमूद आरोपीतांनी बेकायदेशीर रित्या स्वःताचे फायदयासाठी पत्यावर पैसे लावुन तिरर्ट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना जुगाराचे साहीत्य, मोबाईल किंमत 1,16,000/ रु. मोटारसायकल किमत 2,40,000 / रु. व रोख रक्कम 6700 रु. असे एकुन 3,62,700/- रु. चे या मालाचा समावेश आहे. या वरुन गांधी चौक पोलीसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास मा. पो.नि. माकोडे साहेब यांच्या आदेशाने या गुन्ह्यातील पुढील तपास स.फौ. सोनकांबळे करत आहेत. सदरची कार्यवाही ही वरिष्ठांच्या आदेशानुसार पो उप नि. मोमीन, पो. ह. दामोदर मुळे, राजेंद्र टेकाळे, राम गवारे, रणविर देशमुख, शिवा पाटील यांनी पार पाडली.