Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर जिल्ह्यातील 1500 कोटी च्या जलजीवन मिशनच्या कामांमध्ये घोटाळा

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लातूर जिल्ह्यातील 1500 कोटी च्या जलजीवन मिशनच्या कामांमध्ये घोटाळा
खासदार सुधाकर शृंगारे यांनी मागविला कामांचा चौकशी अहवाल

केंद्र सरकार पुरस्कृत असलेली आणि ग्रामीण भागामध्ये हर-घर जल या उद्देशाने देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र जी मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली जल जीवन मिशन योजनेच्या कामांवर गालबोट लागल्याचे निदर्शनास येत आहे. लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास 1500 कोटी रुपयांचे जलजीवन मिशन योजनेची कामे सुरू असून यांपैकी बऱ्याच कामांमध्ये कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे या कामाची विशेष समितीद्वारे चौकशी करण्याची मागणी लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री.सुधाकर शृंगारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

लातूर जिल्ह्यातील जलजीवन मिशनचे अधिकारी आणि ठेकेदार यांनी मिळून या कामांबाबतचा दर्जा अत्यंत निकृष्ट केलेला असून यामुळे या योजनेचा व्यापक दृष्टिकोन खालावत असून देशातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पाणी मिळण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या जनकल्याणकारी योजनेचा जर कोणी गैरवापर करत असेल तर त्यांना माफ करणार नाही असेही खासदार सुधाकर शृंगारे यांनी म्हणले आहे. संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये सध्या जलजीवन मिशनची कामे सुरू असून या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये नळ कनेक्शन आणि त्याद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी देण्याचा व्यापक उद्देश सरकारचा आहे. मात्र जिल्ह्यातील जल जीवन मिशन विभागाच्या संदर्भातील अधिकारी आणि संबंधित कंत्राटदार यांनी मिळून कामी अत्यंत निकृष्ट दर्जाचे केलेली आहेत तसेच काही ठिकाणी कामे पूर्ण न करता संपूर्ण बिले काढून रिकामे अपूर्ण ठेवलेली आहेत. हा प्रकार अत्यंत घृणास्पद असून याबाबत समिती नेमून सखोल चौकशी करावी आणि झालेल्या चौकशीचा अहवाल मला तात्काळ पाठवावा असे निर्देश खा. सुधाकर शृंगारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत.
Previous Post Next Post