Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

पोलीस दलात 20 वर्ष सेवा पूर्ण झालेल्या 250 पोलीस अमलदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदाची वेतनश्रेणी मंजूर...

 पोलीस दलात 20 वर्ष सेवा पूर्ण झालेल्या  250 पोलीस अमलदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदाची वेतनश्रेणी मंजूर...

                 लातूर जिल्हा पोलीस दलातील 20 वर्षे सेवा पूर्ण झालेले 250 पोलीस अमलदारांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा तिसरा लाभ म्हणून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदाची वेतनश्रेणी मंजूर करण्यात आलेली आहे. त्याची सुरुवात पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी केली आहे.
              महाराष्ट्र शासनाकडून पोलीस दलातील पोलीस नाईक हा संवर्ग रद्द करण्यात आलेला असून पोलीस शिपाई यांना सेवा कालावधीत आश्वासित प्रगती योजनेनुसार पदोन्नती साखळीने पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नतीची संधी उपलब्ध करून देण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.
               लातूर जिल्हा पोलीस दलाचे स्थापनेवरील सेवेची विस वर्षे पूर्ण झालेल्या 250 पोलीस अंमलदारांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा तिसरा लाभ म्हणून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदाची वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली आहे .तसे आदेश दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी पोलिस अधीक्षकांनी काढले आहेत.
             पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून भरती झालेल्या पोलीस अंमलदारांना पोलीस अधिकारी म्हणून सेवानिवृत्त होणार आहेत. पोलिस अमलदारांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदाची वेतन श्रेणी मंजूर झाल्याने लातूर जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांचे जीवनमान उंचावणार आहे .
                  याआधी 4 जुलै 2023 रोजी सुद्धा लातूर जिल्हा पोलीस 30 वर्षे सेवा पूर्ण झालेल्या सुमारे 317 पोलीस अमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदाची वेतन श्रेणी मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी 240 पोलिस अमलदारांना त्यांची सेवेची वीस वर्ष पूर्ण झाल्याने त्यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदाची वेतन श्रेणी मंजूर करण्यात आलेली आहे.
                पोलीस अमलदारांना अश्वासित प्रगती योजनेचा लाभ देणे संदर्भाचे कामकाज पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात कार्यालयीन लिपिक महात्मा मोरे व श्रीशैल्य निगुडगे यांनी केले आहे.
               पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी काढलेल्या आदेशामुळे लातूर पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे.
Previous Post Next Post