कव्हा येथील हिटरच्या पाण्याने भाजलेल्या चिमुकल्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी क्रीडाई लातूरतर्फे 70 हजाराची आर्थिक मदत
सामाजिक बांधिलकी ः त्या दोघीवरही दीड महिण्यापासून उपचार सुरू
लातूर दि.29-08-2023
लातूर तालुक्यातील कव्हा येथील माहेश्वरी व योगेश्वर महादेव शेळके या दोन चिमुकल्या मुलींच्या अंगावर हिटर फुटून गरम पाणी पडल्याने त्या दोन्ही मुली 90 टक्के भाजल्या आहेत. त्यांच्यावर शहरातील लहाने हॉस्पिटलमध्ये गेल्या दीड महिण्यापासून उपचार सुरू आहेत. त्यांच्या उपचारासाठी 12 लाखाचा खर्च अपेक्षित आहे. परंतु घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे शेळके कुटुंबिय हा मोठा खर्च करू शकत नाहीत, ही बाब लक्षात घेऊन क्रीडाई लातूर टीमच्यावतीने सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन युवा नेेते तथा भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या उपस्थितीत 70 हजाराची मदत मजगे नगर येथील त्यांच्या निवासस्थानी महादेव शेळके यांच्याकडे सुपूर्त केलेली आहे. त्यामुळे लातूर क्रीडाईच्या सामाजिक कार्याचा आदर्श इतर सामाजिक संस्थासाठी प्रेरणाायी ठरणारा आहे.
यावेळी कव्हा येथील सुभाषअप्पा सुलगुडले, जेएसपीएमचे समन्वयक संचालक निळकंठराव पवार, बसवेश्वर मंडलाचे अध्यक्ष संजय गिर, लक्ष्मण सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
लातूर तालुक्यातील कव्हा येथील महादेव शेळके यांच्या कन्या माहेश्वरी व योगेश्वरी या कव्हा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. गेल्या दीड महिण्यापूर्वी त्यांच्या घरातील हिटर फूटून गरम पाणी उडाल्याने 12 वर्षीय माहेश्वरी व 11 वर्षीय योगेश्वरी या दोन्ही मुली गंभीरपणे भाजलेल्या आहेत. त्यांना उपचारासाठी शहरातील प्रसिध्द डॉक्टर लहाने यांच्याकडे उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. त्या दोन्ही मुलींच्या उपचारासाठी साधारण 12 लाखाचा खर्च अपेक्षित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. परंतु पुढील उपचारासाठी एवढा खर्च करणे शेळके कुटुंबियांना शक्य नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी काही लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांना मदतीसाठी आवाहन केले. त्या आवाहनाला क्रीडाई लातूर या संस्थेनेही प्रतिसाद दिला असून त्यांनी युवा नेेते तथा भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्याशी संपर्क साधून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून 70 हजाराची मदत त्यांच्याकडे सुपूर्त केली. त्यांनी सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून केलेल्या मदतीमुळे गेल्या दीड महिण्यापासून सुरू असलेल्या उपचाराला गती मिळाली आहे. या चिमुकल्या मुलींच्या पुढील उपचारासाठी व त्यांच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी लातूर शहरातील लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था व संघटना यांनी पुढे येऊन आर्थिक मदत करावी, असे आवाहन युवा नेेते तथा भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले आहे.