पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या विरोधकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आंदोलन करणाऱ्या विरोधकांनी पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आमदार रविंद्र धंगेकर, मोहन जोशी, रमेश बागवे इत्यादी नेते आंदोलन करत होते. त्यावेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांसोबत असलेल्या कार्यकर्त्य़ांनादेखील ताब्यात घेतलं आहे. बाजीराव रस्त्य़ावर आंदोलन करण्यात येत आहे.